६ डिसेंबर, २०१९

समुपदेशनाची गरज

समुपदेशनाची गरज
गेल्या दोन-तीन वर्षापासून शहरातील वाहतुकीला शिस्त लागावी यासाठी वाहतूक पोलिसांनी वाहतूक सुरक्षा स्वयंसेवक मोठ्या प्रमाणावर जनजागृती करत आहे. त्यामुळे वाहतुकीचे नियम पाळणाऱ्यांच्या संख्येत वाढ होताना दिसून येत आहे. पण, अद्याप कित्येकजण सर्रास वाहतूक नियमांचे उल्लंघन करताना दिसून येत आहेत. वाहतूक पोलिसांच्या दंडात्मक कारवाईचा देखील फार फरक वाटत नाही. कारवाईच्या विरोधात ओरड केली जाते. दंडात्मक कारवाई होऊनही हेल्मेट आणि सीटबेल्टची गरज वाहनधारकांना समजलेली नाही. तसेच नो पार्किंगच्या ठिकाणीही कशाही गाड्या उभ्या केल्या जात आहेत. नागरिकांच्या मानसिकतेत अद्याप बदल झालेला दिसत नाही. नियम मोडल्यास काय फरक पडतो अशी मुजोरी कायम होताना दिसते. कॉलेज, स्वयंसेवी संस्था पोलिसांच्यावतीने कायमच वाहतूक सुरक्षेच्या संदर्भात जनजागृती मोहीम राबविण्यात येते. अतिशय चांगल्या पद्धतीने वाहनधारकांना वाहतुकीच्या नियमांच्या संदर्भात जागरूक करूनही शहरात हवा तितका बदल घडलेला दिसत नाही. जेव्हा शहरातील सर्व वाहनधारक वाहतुकीचे सर्व नियम पाळतील तेव्हाच खऱ्या अर्थाने शहर स्मार्ट होईल. त्यासाठी दंडात्मक कारवाई जनजागृती मोहीम यांच्या जोडीला वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांची मानसिकता बदलण्यासाठी समुपदेशन होण्याची आवश्यकता आहे.-दादासाहेब येंधे, काळाचौकी, मुंबई

                          

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा