२७ एप्रिल, २०२०

मुंबईच्या महापौर पुन्हा नर्सच्या गणवेशात

मुंबईच्या महापौर पुन्हा नर्सच्या गणवेशात
मुंबई, दादासाहेब येंधे: देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत कोरोनाबाधितांचा आकडा एकीकडे वाढत असताना दुसरीकडे मात्र मुंबईतल्या आरोग्य सेवेवर मोठा ताण पडत आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन मुंबईच्या महापौर कीशोरीताई पेडणेकर यांनी नुकतीच नायर रुग्णालयात जाऊन वैद्यकीय कर्मचाऱ्यांची भेट घेतली.
महापौर किशोरी पेडणेकर यांनी आधी परिचारिका म्हणून काम केलं आहे. अनेक वर्षे शिवसेनेच्या नगरसेवक राहिलेल्या पेडणेकर सध्या मुंबईच्या महापौर म्हणून कार्यरत आहेत. सध्या कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मुंबईतील महापालिकेच्या रुग्णालयांत कोरोनाबधितांवर उपचार सुरू आहेत. इथल्या कर्मचाऱ्यांवर कामाचा मोठा ताण पडत आहे. याच गोष्टीचे गांभीर्य लक्षात घेऊन नायर रुग्णालयातील डॉक्टर, नर्स आणि इतर कर्मचाऱ्यांचा हुरूप वाढविण्यासाठी कोशोरीताई परिचारिका घालत असलेला गणवेश परिधान करून नायर रुगण्यात आल्या होत्या. यावेळी त्यांनी येथील वैद्यकीय कर्मचाऱ्यांना त्यांनी काही सूचनाही केल्या. 


११ एप्रिल, २०२०

गृहनिर्माण सोसायट्यांकडून कोरोनाला 'नो एन्ट्री'

गृहनिर्माण सोसायट्यांकडून कोरोनाला 'नो एन्ट्री'
मुंबई, दादासाहेब येंधे : कोरोना या विषाणूला थोपविण्यासाठी मुंबई शहर आणि उपनगरांत विविध उपाययोजना युद्धपातळीवर राबविल्या जात असतानाच काळाचौकी येथील श्रीकृपा हौ. सोसायटी, रंगारी बदक चाळ गणेशोत्सव मंडळ, ओमकार रहिवाशी संघ सोसायटी आदींनी कोरोनाला सोसायटीबाहेरच ठेवण्यासाठी पुढाकार घेताना दिसत आहेत.
सोसायटीमधील पदाधिकारी व्हॉट्सअपच्या माध्यमातून राहिवाश्यांसोबत संपर्क साधत पदाधिकारीही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारी आदेशांचे पालन करीत विविध उपक्रम राबवत कोरोनाविरोधातील लढ्यात आपले योगदान देत आहेत. 


श्रीकृपा हौ. सोसायटीचे अध्यक्ष श्री. लक्ष्मण देवरुखकर, सेक्रेटरी श्री. संतोष सकपाळ, गणेश काळे, महेश पांगे यांनी सांगितले की, आम्ही स्वतःच क्वारंटाईन होऊन आम्ही आमच्या सोसायटीत कोरोनाचा शिरकाव होऊ देणार नाही. आमच्या सोसायटीने तातडीने उपाययोजना म्हणून सोसायटीचे मुख्य गेट बंद केले आहे. तसेच सोसायटीच्या मुख्य गेटमधून आत येताना गेटवर जीवन प्रबोधिनी ट्रस्ट तर्फे हात धुण्यासाठी पाणी व सॅनिटायझर उपलब्ध करून दिले आहे.

 ओमकार रहिवाशी संघ या सोसायटीचे पदाधिकारी श्री. नरेंद्र पांगे, घाडीगांवकर यांनीही खबरदारी म्हणून सोसायटीचे मुख्य गेट बंद केल्याचे सांगितले.


 तसेच गेटवर नागरिकांनी स्वतःची कोरोनापासून वाचण्यासाठी काय काळजी घ्यावी याचा बोर्डदेखील लावल्याचे सांगितले. तर रंगारी बदक चाळ सार्वजनिक गणेशोत्सतव मंडळातर्फे मुख्य गेटच्या समोर उड्डाणपुलाच्या पिलरवर कोरोना या विषाणूपासून घाबरून न जाता स्वतःची काय काळजी घ्यावी याची सविस्तर माहिती तसेच राज्यस्तरीय नियंत्रण कक्ष नंबर, टोल फ्री नं., राष्ट्रीय कॉल सेंटर क्रमांकाचा बोर्ड लावण्यात आला आहे.१० एप्रिल, २०२०

सोशल डिस्टिंगशिंगचे तीनतेरा

सोशल डिस्टिंगशिंगचे तीनतेरा
मुंबई, दादासाहेब येंधे : भायखळा येथील भाजी  मार्केट अगदी कमी जागेमध्ये वसलेले आहे. महापालिका प्रशासनाने व मुंबई पोलिसांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येथे गर्दी होऊ नये म्हणून राणीबागेत सदर मार्केट स्थलांतरित केले. मात्र, तिथेही गर्दी करीत नागरिकांनी सोशल डिस्टिंगशिंगचे नियम पायदळी तुडवले. अगदी जवळ जवळ उभे राहून नागरिकांच्या भाजीपाल्याचे भाव विचार त्यांना दिसून येत होते. पोलीस वारंवार नागरिकांच्या सूचना देतानाचे चित्र समोर येत आहे.५ एप्रिल, २०२०

देशात दिवे लावून ऐक्याचं दर्शन

देशात दिवे लावून ऐक्याचं दर्शन
हा उत्सव नव्हे एकतेचा संदेश
मुंबई, दादासाहेब येंधे : माननीय पंतप्रधान नरेंद मोदी यांनी केलेल्या आवाहनाला ९ वाजून ९ मिनिटांपर्यंत प्रत्येक भारतीयाने आपल्या घरातील लाईट बंद करत सोशल डिस्टंकशिंग पाळत आपापल्या घरात, गॅलरीत मोबाईल टॉर्च, दिवे, मेणबत्ती पेटवून ऐक्याचं दर्शन घडविलं.

यावेळी 'भारत माता की जय, 'गो कोरोना गो' आणि एकतेच्या घोषणा ऐकायला मिळाल्या. यावेळी सारा आसमंत दुमदुमून गेला होता.

कोरोनाने संपूर्ण जगात थैमान घातले आहे. आता तो आपल्या देशातही वेगाने हातपाय पसरू लागला आहे. त्याचा सामना करण्यासाठी सरकारने संपूर्ण देशातच लॉकडॉऊन केले आहे. या काळात जनतेने आपल्या घरातच राहावे आणि सोशल डिस्टंसिंगचे काटेकोरपणे पालन करावे, असेही सरकारच्या वतीने सांगण्यात आले आहे. एवढेच नाही, तर या कोरोनाचा पराभव करण्यासाठी जनतेने काय करावे आणि काय करून नये यासंदर्भातही वारंवार सरकारकडून सूचना केल्या जात आहे. जनतेकडूनही मोठ्या प्रमाणावर याचे पालन केले जात आहे. आज पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनाला संपूर्ण देशातील जनतेने उत्स्फूर्त प्रतिसाद देत कोरोनाविरुद्धच्या या लढाईत आम्ही सर्व एक आहोत याचे दर्शन घडवले आहे.

काळाचौकी, मुंबई येथील श्रीकृपा हौ. सोसायटीत मेणबत्त्या प्रज्वलित
करून करोना चा निषेध केला.
कासार वडवली पोलीस ठाणे, ठाणे
४ एप्रिल, २०२०

सोशल मिडियामधून तेढ पसरवणाऱ्यांना मुख्यमंत्र्यांचा इशारा

सोशल मिडियामधून तेढ पसरवणाऱ्यांना मुख्यमंत्र्यांचा इशारा
मुंबई, दादासाहेब येंधे :  कृपा करून शिस्त पाळा, सहकार्य करा असे मी जेंव्हा हात जोडून म्हणतो ते माझ्या महाराष्ट्रातील तमाम बंधु, माता- भगिनींसाठी असते जे अतिशय संयमाने, जिद्दीने आणि आत्मविश्वासाने या कोरोना विषाणुविरुद्ध लढत आहेत. पण समाजात आणखी एक समाजविघातक विषाणू पसरत आहे, सध्याच्या परिस्थितीचा दूरूपयोग करून जर कुणी माझ्या बंधू, माता-भगिनी आणि महाराष्ट्राला अडचणीत आणत असेल तर अशा समाजविघातक वृत्तींवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल असा सज्जड इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला. आज मुख्यमंत्र्यांनी समाज माध्यमांवरील थेट प्रसारणाच्या माध्यमातून जनतेला संबोधित केले. प्रारंभी त्यांनी सोलापूरच्या ७ वर्षाच्या आराध्या नावाच्या मुलीने वाढदिवसाच्या निमित्ताने मुख्यमंत्री सहाय्यता निधीस मदत केल्याचा  आवर्जून उल्लेख केला व तिला शुभेच्छा दिल्या.
एकजुटीला गालबोट लावू देणार नाही कोणत्याही धर्माच्या, पक्षाच्या कोणत्याही कार्यक्रमांना मान्यता नाहीच. राज्यात पाडवा, रामनवमी, पंढरपुरची यात्रा यासारखे सर्व मोठे सण अगदी घरगुती स्वरूपात आयोजित झाले, कोणतेही मोठे उत्सव वा कार्यक्रम झाले नाहीत. ज्याप्रमाणे हे कार्यक्रम झाले त्याचप्रमाणे इतर धर्मियांनी सुद्धा आपले सण, समारंभ आणि कार्यक्रम करावेत, एकत्र येणे, गर्दी करणे टाळावे कारण राज्यात कोणत्याही धर्माच्या, राजकीय पक्षाच्या आणि कोणत्याही कारणासाठी कोणत्याही कार्यक्रमांना, खेळाच्या स्पर्धांना परवानगी दिली जाणार नाही म्हणजे नाहीच, तशा सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. त्यामुळे असे कार्यक्रम आयोजित केलेच जाऊ नयेत असे कडक शब्दात स्पष्ट करून मुख्यमंत्री म्हणाले की, या विषाणुशी सगळे एकजुटीने लढत आहेत. याला कुणी गालबोट लावण्याचा प्रयत्न करू नये, ते सहन केले जाणार नाही. इलाज म्हणून नाईलाजाने घरी बसा. हा विषाणु कोणताही जातधर्म पहात नाही. याची बाधा सगळ्यांना सारखीच होते. त्यामुळे इलाज म्हणून नाईलाजाने का होईना घरी बसा, गर्दी टाळा, संयम, जिद्द आणि आत्मविश्वासारखे दुसरे आयुध नाही, या आयुधाच्या मदतीने आपण हे युद्ध नक्की जिंकू असे सांगतांना मुख्यमंत्र्यांनी आज समाजविघातक कृत्ये करणाऱ्या प्रवृत्तींना आपल्या बोलण्यातून स्पष्ट इशारा आणि कडक कारवाईचे संकेत दिले आहेत. (महासंवाद)
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुबई विभागातर्फे मोफत जेवण वाटप

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुबई विभागातर्फे मोफत जेवण वाटप
मुंबई, दादासाहेब येंधे : महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे मुंबई विभागीय अध्यक्ष मा. संदीप माळवदे, पत्रकार उमेश कुडतरकर आणि सहकारी यांनी मुंबईतील मालाड येथील झोपडपट्टीतील गरीबांना मोफत जेवण वाटप केेेले.
 करोना या विषाणूच्या पार्श्वभूमीवर देश लॉक असताना मुंबई शहरात रस्त्यावरील छोट्या-मोठ्या खाऊगल्ल्या, हातगाड्या, हॉटेल बंद झाल्यामुळे रस्त्यावरील भिकाऱ्यांचे, गरिबांचे, गरजवंतांचे खाण्यापिण्याचे हाल सुरू झाले आहेत. लॉकडाऊनमुळे  त्यांच्या उपजीविकेची सर्व संसाधने बंद झाली आहेत.  अशा गरिबांना महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुबई विभागातर्फे मोफत जेवण पाकिटांचे वाटप करण्यात आले.
२ एप्रिल, २०२०

धक्कादायक ! लोहमार्ग पोलिसाला कोरोनाची लागण


पोलीसांनी गाण्यातून दिला घरातच बसण्याचा संदेश

पोलीसांनी गाण्यातून दिला घरात बसण्याचा महत्त्वाचा संदेश
मुंबई, दादासाहेब येंधे: कोरोना या विषाणूवर मात करण्यासाठी सरकार तसेच प्रशासनाने कंबर कसली आहे. नागरिकांनी नियमांचे पालन करून सरकार आणि प्रशासनाला साथ द्यावी, असे आवाहन वारंवार करण्यात येत आहे. संचारबंदी, लॉक डाऊनच्या काळात कुणीही घराबाहेर पडू नये अशा सूचनाही पोलिसांमार्फत वायरलेस गाडीवरून गल्लो-गल्ली फिरून देण्यात येत आहे.
माननीय मुुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आरोग्यमंत्री हेही राज्यातील जनतेला वेळोवेळी मार्गदर्शन करीत आहेत. विविध वृत्तपत्रांतून, न्यूज चॅनेलमधून, बातम्यांतून पत्रकारही जनजागृती करत आहेत.
यातच राज्याच्या पोलीस दलातील काही पोलीस बांधवांनी वेगळी शक्कल लढवली आहे. गाण्याच्या माध्यमातून नागरिकांमध्ये कोरोना विषाणूसंदर्भात जनजागृती करून घराबाहेर न पडण्याचे अनोखे आवाहन करताना दिसून  येत आहे. 
'घरात बसा, रोडवर फिरता कशाला...
कोरोना होईल रोगानं या मरता कशाला...