२७ डिसेंबर, २०१८

माणुसकी अजूनही जिवंत

माणुसकी अजूनही जिवंत ४० हजार केले परत

मुंबई, दादा येंधे:  सध्याच्या काळात प्रामाणिकपणा शोधूनही सापडत नाही, असे बोलले जाते. एखादी मोठी रक्कम हाती लागल्यास ती संबंधितांना परत केल्याचे प्रसंगही दुर्मिळ, पण कांदिवली (प.) येथील देना बॅंकेतून पैसे काढल्यावर श्री. कनुभाई नायी यांना त्यांच्या हातात ४० हजार रुपये जास्त आल्याचे लक्षात आले. मग त्यांनी ते पैसे स्वतः कडे न ठेवता देना बँकेच्या मॅनेजर यांना परत केले. त्याबद्दल मॅनेजर यांनी कनुभाई यांचे आभार मानले. माणुसकी, प्रामाणिकपणा जिवंत असल्याची प्रचिती या प्रसंगातून आली.
कनुभाई नायी हे आपल्या सेव्हिंग खात्यातील रक्कम काढण्यासाठी देना बँक (कांदिवली, पश्चिम) एस. व्ही. रोड येथील शाखेत आपल्या मुलीच्या लग्नाच्या खरेदीकरिता पैसे काढण्यासाठी गेले होते. तेव्हा त्यांनी कॅशियरकडून ५० हजार रुपये काढले. ते पैसे मोजत मोजत बँकेच्या बाहेर गेले असता त्यांच्या लक्षात आले की, बँकेच्या कॅशियरने त्यांना चुकून एकूण ९० हजार दिले आहेत. म्हणजेच एकूण रुपये ४० हजार जास्त.
देना बँकेच्या कॅशियरने कनुभाई नायी यांना २ हजार रुपयांच्या ४० नोटा आणि ५०० रुपयांच्या २० नोटा दिल्या. २ हजाराच्या २० नोटा देण्याऐवजी ४० नोटा कॅशियरने त्यांना दिल्या होत्या.
४० हजार रुपये म्हणजे थोडीथोडकी रक्कम नाही. कनुभाई यांनी ती जास्तीची रक्कम बँकेला परत केली, हा त्यांचा मोठेपणा आहे. त्यांच्यावर झालेल्या संस्काराचा तो भाग आहे. मुलीच्या लग्नासाठी पैशांची गरज असताना कुणीही अशी रक्कम स्वतः कडे ठेवली असती. पण, कांदिवली येथे एका साध्या चाळीत राहाणाऱ्या कनुभाई यांना ते रुचले नाही. त्यांनी थेट बँकेच्या मॅनेजरलाच भेटून जास्तीची रक्कम परत केली. माणसांच्या भाऊगर्दीत एकीकडे माणुसकीचा झरा आटत असतानाच, मुंबईत मात्र देवदूतच अवतरला असे उद्गार देना बँकेच्या कॅशियरने काढत कनुभाई नायी यांचे आभार मानले. कनुभाई यांच्या प्रमाणिकपणाबद्दल सर्व स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत आहे.

१९ डिसेंबर, २०१८

५ डिसेंबर, २०१८

मराठा आरक्षण समूहशक्तीचा विजय - लोकमत


चिंचपोकळी येथे कचऱ्याचा ढीग - महाराष्ट्र टाइम्स


पोलिसांना मानसिक आधाराची गरज - सामना


२० नोव्हेंबर, २०१८

खाकी वर्दीपुढे प्रतिमेचे आव्हान


महिलांनी नेहमी सावध रहावे


तापमानवाढ


कचरा फेकणे- प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखावी


घाट रस्ते- चालकांचे प्रबोधन व्हावे


प्लॅस्टिकबंदी- व्यापक जनजागृतीची गरज
मराठा समाजाला आरक्षण द्याच
रेल्वे अपघात- बेजाबाबदरपणाचे बळी
मुंबईत झोपड्यांची सुरक्षा वाऱ्यावर


मुंबईतील सुरक्षित प्रवासासाठी

सुरक्षित प्रवास

नावासोबतच शहरांची स्थितीही बदला


रेल्वेचा ढिसाळ कारभार


१५ ऑक्टोबर, २०१८

भक्तांच्या हाकेला धावणारी दुर्गामाता


हिंदुस्थानच्या परराष्ट्र धोरणाचा विजय


भारताच्या परराष्ट्र धोरणाचा विजय


भक्तांच्या हाकेला धावणारी दुर्गामाता


भारताच्या परराष्ट्र धोरणाचा विजय


हिंदुस्थानच्या परराष्ट्र धोरणाचा विजय


८ ऑक्टोबर, २०१८