३१ ऑगस्ट, २०१९

लालबागचा राजा यंदा चांद्रभूमीवर विराजमान

लालबागचा राजा यंदा चांद्रभूमीवर विराजमान
मुंबई, दादासाहेब येंधे: लालबागचा राजा यंदा चांद्रभूमीवर विराजमान झाल्याचे भाविकांना बघावयास मिळणार आहे. यंदा मंडळाचे ८३वे वर्ष असून भारताला सुपरपॉवर बनविण्यासाठी इस्रो करत असलेल्या देदिप्यमान कामगिरीचा गौरव करण्यासाठी हाच सुवर्णक्षण होता. त्यामुळेच यंदा लालबागच्या राजाच्या दरबारात राजाच्या दर्शनासोबतच इस्रोच्या यशोगाथेचे दर्शन घडविण्याचा योग मंडळाने घडवून आणला आहे. 







२८ ऑगस्ट, २०१९

अमेरिकेतील 'मराठी कल्चर अँड फेस्टिव्हल' दिवाळी अंकास उत्कृष्ट अंक पुरस्कार


अमेरिकेतील 'मराठी कल्चर अँड फेस्टिव्हल' दिवाळी अंकास उत्कृष्ट अंक पुरस्कार

अमेरिकेतून प्रकाशित होणाऱ्या 'मराठी कल्चर अँड फेस्टिव्हल' या दिवाळी अंकाला मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई या संघाच्या वतीने आयोजित केलेल्या ४४ व्या राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धेत उत्कृष्ट दिवाळी अंक म्हणून नुकतेच पुरस्काराने गौरविण्यात आले. लॉस एंजलीस येथे वास्तव्यास असणाऱ्या ऐश्वर्या कोकाटे या अंकाच्या संपादिका आहेत. गेली चार वर्षे हा अंक प्रकाशित होत आहे. स्वान्त सुखाय या उद्देशाने सुरु केलेला या उपक्रमासाठी त्यांनी जगातील समविचारी आणि समभाषिक लोकांना लिखाणासाठी साद घातली त्याला उदंड प्रतिसाद देत
न्यु जर्सी, लॉस एंजलीस, गिलबर्ट्स,सॅन फ्रान्सिस्को, लंडन, आफ्रिका,कॅनडा, सिंगापूर, जर्मनी या ठिकाणच्या परदेशातील अनेक मराठी माणसांनी कथा,कविता, लेख,आठवणी लिहून पाठविल्या होत्या. विशेषतः महिला व लहान मुलांच्या लेखनास या अंकात अधिक वाव देण्यात आला आहे.

खचलेलेले गटाराचे झाकण बदला

खचलेले गटाराचे झाकण बदला
भायखळा येथील डॉ. आंबेडकर रोडवरील रतनशी ऍग्रो या दुकानासमोर रस्त्यावरील गटाराचे झाकण खचले असून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी महापालिकेने त्वरित गटाराचे खचलेले झाकण बदलावे.



२६ ऑगस्ट, २०१९

गणेशमूर्त्या मंडपाकडे निघाल्या

गणेशमूर्त्या मंडपाकडे निघाल्या
गणेशोत्सव अवघ्या एका आठवड्यावर येऊन ठेपल्याने मुंबईचे वातावरण आता बाप्पामय झाले आहे. मुंबई तसेच उपनगरातील चाळीसहून अधिक छोट्या-मोठ्या मंडळांच्या मिरवणुका रविवारी निघाल्याने लालबाग-परळ परिसर गणेश भक्तांनी अक्षरशः फुलून गेला होता. मंडपातील सजावटीच्या दृष्टीने बहुतांश सार्वजनिक मंडळांचे गणपती बाप्पा रविवारी मंडपाकडे रवाना होताना दिसून येत होते. या सर्व मिरवणुका कुठलाही अनुचित प्रकार न घडता पार पडल्या. यावेळी काही बेशिस्त दुचाकीस्वरांमुळे वाहतुकीचे नियोजन करताना पोलिसांची मात्र दमछाक होताना दिसत होती. यंदा मूर्तिकारांनी गणेश मूर्तीबाबत वेगळा प्रयोग केल्याने रविवारच्या मिरवणुकांमध्ये अनेक गणेश मुर्ती विशेष लक्षवेधी ठरत होत्या. ड्रॅगन वर बसलेला बाप्पा, गरुडावर विराजमान झालेला विष्णू, श्रीशंकर, हनुमान आदी देवतांच्या रूपांतील विविध मूर्तींचा यात समावेश होता.



२५ ऑगस्ट, २०१९

यंदा दहीहंडीचा उत्साह ओसरला

यंदा दहीहंडीचा उत्साह ओसरला
गल्लीबोळातून निघणाऱ्या मोटरसायकल आणि वाहतूक कोंडी करणारे ट्रकच्या ट्रक भरून जाणारे गोविंदाचे पथक, डीजेची धडकी भरवणारा आवाज, बघ्यांच्या गर्दीचे लोंढे असा  दरवर्षी दहीहंडीला असणारा माहोल शनिवारी कुठेतरी हरवल्यासारखा दिसला. त्यामुळे यंदाच्या दहीहंडी उत्सव कुठेतरी चुकल्या चुकल्यासारखं प्रत्येकाला वाटत होता. नेहमी दहीहंडीच्या निमित्ताने होणाऱ्या जल्लोष यंदा अतिशय तुरळक ठिकाणी पाहायला मिळाला. एकूणच दहीहंडी आयोजक ढेपाळल्याने गोविंदाचा उत्साहही मरगळल्यासारखा दिसून येत होता.

१५ ऑगस्ट, २०१९

रंगारी बदक चाळीत ७३ वा स्वातंत्र्यदिन साजरा

मुंबई, दादासाहेब येंधे: रंगारी बदक चाळ रहिवासी संघ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने ७३ वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सीमेचे संरक्षण करणारे रंगारी बदक चाळीचे सुपुत्र भारतीय सैनिक अतुल सतीश परुळेकर यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. प्रसंगी मंडळाचे अध्यक्ष श्री. भाई मयेकर, सेक्रेटरी श्री. दत्ता झोडगे, कार्याध्यक्ष श्री. अनिल हेलेकर,  खजिनदार श्री. शंकर साळवी तसेच अनिल घाडी, शाम आचरेकर, जयंत साखरकर, विनायक येंधे, सुनील डीचोलकर, दयानंद घाडी, प्रफुल्ल, प्रकाश पेडणेकर, नागेश तांदळेकर, संतोष सकपाळ आदी कार्यकर्ते तसेच शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ध्वजारोहण झाल्यानंतर शालेय विद्यार्थ्यांना व लहान मुलांना खाऊ वाटप करण्यात आला.




१४ ऑगस्ट, २०१९

हौशी वृक्षारोपण नसावे


चिंचपोकळी चिंतामणीचे जल्लोषात आगमन

चिंचपोकळी चिंतामणी मंडळाचे शतक महोत्सवी वर्ष असल्याने रविवारी पार पडलेल्या आगमन सोहळ्यात विविध ठिकाणांहून गणेशभक्तांनी हजेरी लावली होती. दुपारी सुरू झालेल्या या आगमन सोहळ्यासाठी रविवारी सकाळपासूनच गणेशभक्तांनी चिंचपोकळी मंडळाचे टी-शर्ट परिधान केलेले तरुण-तरुणींचे गट चिंचपोकळी-करीरोड रेल्वे स्थानकांवर येत होते. चिंचपोकळीच्या आर्थर पूल धोकादायक असल्याने त्या ठिकाणी गर्दी करू नये, असा आदेश देऊनही तरुण मोठया प्रमाणात पुलावर गर्दी करताना दिसत होते. काळाचौकी पोलिसांनी पुढाकार घेत गर्दीवर नियंत्रण मिळवले. यावर्षी एक हजाराहून अधिक कार्यकर्त्यांची फौज पोलिसांच्या दिमतीला हजर होती. अशी माहिती मंडळाचे हितचिंतक दादासाहेब येंधे यांनी दिली असून काही तुरळक घटना वगळता सांयकाळी ७ वाजता चिंतामणी गणपती ने मंडपात प्रवेश केला. महाराष्ट्रात उदभवलेल्या पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी चिंचपोकळी मंडळाने पाच लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री सहायता निधीसाठी जाहीर केली आहे. असे मंडळाचे अध्यक्ष श्री. उमेश नाईक यांनी सांगितले आहे.




९ ऑगस्ट, २०१९

बेस्टने दर्जा सुधारावा

बेस्टने दर्जा सुधारावा
मुंबई, (दादासाहेब येंधे):  मुंबईतील बेस्ट बसेसना मेट्रो-मोनोसह रिक्षा-टॅक्सीचीही शर्यत आहे. ही शर्यत कठीण असल्यामुळे जनतेची साथ तसेच सरकारी पाठिंबा या जोरावर बेस्ट आजही 'द बेस्ट ठरू शकेल'. यासोबतच गरज आहे ती बेस्टने आपल्या सेवेचा दर्जा सुधारण्याची. एसटीच्या संदर्भातही हाच निर्णय प्रभावीपणे राबविण्याची गरज आहे.


६ ऑगस्ट, २०१९

आर्या मेमाने हिने कांस्यपदक पटकावले

आर्या मेमाने हिने कास्यपदक पटकावले

दादासाहेब येंधे ,मुंबई: साऊथ कोरिया येथे नुकत्याच पार पडलेल्या तायक्वांडो या कराटे प्रकारात जिऑजू व ग्वानजु ओपन इंटरनॅशनल तायक्वांडो चॅम्पियनशिप ही स्पर्धा नुकतीच पार पडली. या स्पर्धेत जगभरातून २४ देशांनी सहभाग नोंदवला होता. सदर स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणारी मुंबईतील आग्रीपाडा येथे राहणारी कुमारी आर्या मेमाने वय वर्ष ७ हिने या स्पर्धेत जिऑनज याठिकाणी बी श्रेणी मध्ये भारताला तिसरे स्थान मिळवून देत कांस्यपदक पटकावले. तर ग्वानज या ठिकाणी देखील तिने अथक परिश्रम करीत अ श्रेणी मध्ये बाजी मारत तिसरे स्थान मिळवून पुन्हा एकदा कास्य पदक पटकावले. सदर कामगिरी करिता तिला जालनावाला स्पोर्ट्स ट्रेनिंग रिसर्च सेंटर मास्टर श्री. निलेश अशोक जालनावाला यांचे आणि तिचे प्रशिक्षक श्री. रोहिदास शिर्के व श्री. नवीन दवे यांचे उत्तम मार्गदर्शन व प्रशिक्षण लाभले आहे. कुमारी आर्या ही इयत्ता ३री मध्ये सेंट जोसेफ हायस्कूल आग्रीपाडा येथे शिकत आहे. मुंबई पोलिस दलात दक्षिण नियंत्रण कक्ष वायरलेस विभागात कार्यरत असलेल्या श्रीमती. रिद्धी गणेश मेमाने यांच्या कन्येच्या या अभूतपूर्व यशाबद्दल पोलीस दलात तिचे कौतुक होत आहे.






५ ऑगस्ट, २०१९

पर्यटकांनी जबाबदारीने वागावे


पर्यटकांनी जबाबदारीने वागावे


घनकऱ्याचे व्यवस्थापन व्हावे


१ ऑगस्ट, २०१९

पाणीगळती रोखा


पाणीगळती रोखा
मुंबई, दादासाहेब येंधे : काळाचौकी येथील रंगारी बदक चाळीच्या मुख्य गेटवर ड्रेनेज लाइनचे काम सुरु असताना पाइपलाइनला गळती लागली आहे. ड्रेनेजचे काम होऊन सुद्धा अजूनही पाणी गटारीतून वाहत आहे. रहिवाशांना पदपथावरून नीट चालताही येत नाही. एकीकडे पाणी टंचाई आहे तर दुसरीकडे पिण्याचे पाणी गटारीतून वाहत आहे. तरी महानगरपालिकेने पाणी गळती रोखावी.