२५ डिसेंबर, २०१९

कार्यालयीन वेळा बदला


स्पीड ब्रेकर नियोजनाची गरज


गतिरोधक कशासाठी?


२२ डिसेंबर, २०१९

रौप्य महोत्सवी सोहळा संपन्न


शिवछाया को. ऑप.क्रेडिट सोसायटीचा रौप्य महोत्सव साजरा
मुबई, दादासाहेब येंधे: शिवछाया क्रेडिट को. ऑप. क्रेडिट सोसायटी चा रौप्य महोत्सवी वर्ष सोहळा नुकताच मुबईत घाटकोपर येथे संपन्न झाला. मुंबई शहरात  नोकरी, व्यवसायानिमित्त, शिक्षणासाठी जुन्नर तालुक्यातील हिवरे खुर्द गावातून आलेल्या होतकरू तरुणांनी जनसामान्यांच्या उन्नत्तीसाठी सहकार या एकमेव उद्दीष्ठाने, पंचवीस वर्षांपूर्वी लावलेल्या रोपट्याचे आज वटवृक्षात रूपांतर झाले आहे. एकेकाळी समाजातील शेतकरी सावकारी कर्जात अडकला असताना, गरीब, गरजू शेतकऱ्यांना सहकारी संस्थेच्या माध्यमातून पतपुरवठा व्हावा, म्हणून स्थापन झालेल्या या सहकारी पतपेढीच्या आज तीन अद्ययावत शाखा कार्यरत असून सोसायटीचे १६०० सभासद आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. सुरेश जाधव होते. तसेच उपाध्यक्ष श्री. विलास गं. येंधे, मानद सचिव श्री. रावजी भि. वायकर, कार्याध्यक्ष श्री. गोविंद जाधव, सचिव रौप्य महोत्सव समिती श्री. अनिल कि. येंधे, श्री. गंगाराम गे. लोखंडे, संचालिका सौ. सुचिता सं. जाधव, सौ.सुलोभना भा. येंधे, तज्ञ संचालक (बँक) श्री. विलास रो. येंधे आदी आजी-माजी पदाधिकारी, हितचिंतक तसेच हिवरे खुर्द येथील ग्रामस्थ, सभासद मोठया संख्येने उपस्थित होते. रौप्य महोत्सव सोहळ्यानिमित्त मनोरंजनपर कलारंजना मुंबई प्रस्तुत-मराठी पाऊल पडते पुढे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला प्रेक्षक म्हणून उपस्थित असलेल्या सभासदांनी भरभरून प्रतिसाद दिला. सोसायटीने रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त स्मरणिका व नवीन वर्षाच्या दिनदर्शिकेचे उदघाटन केले.
१८ डिसेंबर, २०१९

लुटीच्या उद्देशाने अपहरण


अतिक्रमणाला आळा घाला


कार्यालयीन वेळा बदला


१० डिसेंबर, २०१९

रंगारी बदक चाळ येथे दत्तजयंती उत्सवाचे आयोजन

रंगारी बदक चाळ येथे दत्तजयंती उत्सवाचे आयोजन
मुंबई, (दादासाहेब येंधे): काळाचौकी येथील रंगारी बदक चाळीच्या पटांगणात नवबालक क्रीडा मंडळ यांच्यावतीने श्री दत्तजयंती उत्सव, श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन ११ डिसेंबर रोजी करण्यात आले आहे. यानिमित्ताने दत्तजयंती उत्सवाचे औचित्य साधून सकाळी ९.०० ते रात्रौ ९.०० वा.पर्यंत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मंडळाचे प्रमुख विश्वस्त श्री. अनिल हेलेकर यांच्या उपस्थितीत सदर कार्यक्रम साजरा होणार असून दत्तगुरूंच्या पादुकांचे पूजन सकाळी ९ वाजता, होमहवन सकाळी १० ते दुपारी १.०० वाजता, श्रीसत्यनारायची पूजा दुपारी २.०० वाजता, महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ संध्याकाळी ५.०० वाजता  आयोजित करण्यात आला आहे. सत्कार मूर्तींचा सत्कार, समणिका प्रकाशन तसेच २०२० च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात येणार आहे. या उत्सवात मोठया संख्येने सहभागी होण्याचे आवाहन मंडळाचे अध्यक्ष श्री. सुनिल पावसकर, कार्याध्यक्ष सुनिल घाडीगांवकर, सरचिटणीस सचिन राजमाने, कोषाध्यक्ष दयानंद घाडीगांवकर तसेच स्वागताध्यक्ष योगेश राणे यांनी केले आहे.६ डिसेंबर, २०१९

समुपदेशनाची गरज

समुपदेशनाची गरज
गेल्या दोन-तीन वर्षापासून शहरातील वाहतुकीला शिस्त लागावी यासाठी वाहतूक पोलिसांनी वाहतूक सुरक्षा स्वयंसेवक मोठ्या प्रमाणावर जनजागृती करत आहे. त्यामुळे वाहतुकीचे नियम पाळणाऱ्यांच्या संख्येत वाढ होताना दिसून येत आहे. पण, अद्याप कित्येकजण सर्रास वाहतूक नियमांचे उल्लंघन करताना दिसून येत आहेत. वाहतूक पोलिसांच्या दंडात्मक कारवाईचा देखील फार फरक वाटत नाही. कारवाईच्या विरोधात ओरड केली जाते. दंडात्मक कारवाई होऊनही हेल्मेट आणि सीटबेल्टची गरज वाहनधारकांना समजलेली नाही. तसेच नो पार्किंगच्या ठिकाणीही कशाही गाड्या उभ्या केल्या जात आहेत. नागरिकांच्या मानसिकतेत अद्याप बदल झालेला दिसत नाही. नियम मोडल्यास काय फरक पडतो अशी मुजोरी कायम होताना दिसते. कॉलेज, स्वयंसेवी संस्था पोलिसांच्यावतीने कायमच वाहतूक सुरक्षेच्या संदर्भात जनजागृती मोहीम राबविण्यात येते. अतिशय चांगल्या पद्धतीने वाहनधारकांना वाहतुकीच्या नियमांच्या संदर्भात जागरूक करूनही शहरात हवा तितका बदल घडलेला दिसत नाही. जेव्हा शहरातील सर्व वाहनधारक वाहतुकीचे सर्व नियम पाळतील तेव्हाच खऱ्या अर्थाने शहर स्मार्ट होईल. त्यासाठी दंडात्मक कारवाई जनजागृती मोहीम यांच्या जोडीला वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांची मानसिकता बदलण्यासाठी समुपदेशन होण्याची आवश्यकता आहे.-दादासाहेब येंधे, काळाचौकी, मुंबई

                          

समुपदेशनाची गरज


३ डिसेंबर, २०१९

पोलिसांच्या समस्या सोडवा


पोलिसांच्या अडचणी दूर कराव्यात


नव्या सरकारने पोलिसांच्या अडचणी दूर कराव्यात


पोलिसांच्या अडचणी दूर कराव्यात

पोलिसांच्या अडचणी दूर कराव्यात
मुंबई, दादासाहेब येंधे: कायदा व सुव्यवस्था सांभाळत असताना पोलीस व त्यांचे कुटुंबीय विविध आजारांनी त्रस्त आहेत. पोलिसांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी पोलीस रुग्णालये उभारण्यात आली. मात्र, या रुग्णालयांची अवस्था अतिशय बिकट आहे. रुग्णालयांत औषधांचा तुटवडा आहे. अस्वच्छता आहे. अशा परिस्थितीत पोलीस आणि त्यांच्या कुटुंबियांचे आजार बरे होण्याऐवजी दुसऱ्याच आजाराची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आज घडीलाही पोलिसांना स्वतःच्या हक्कांसाठी लढण्यासाठी संघटना काढण्यास सरकारकडून परवानगी देण्यात आली नाही. आठ तास कामाच्या योजनेचाही बट्ट्याबोळ झालाय. पोलीस वेळेवर घरी पोहचत नाहीत त्यामुळे वेळेवर जेवण, औषध-पाणी घेता येत नाही. कुटुंबाकडे लक्ष देता येत नाही. परिणामी, पोलीस आणि त्यांचे नातेवाईक अस्वस्थ बनताहेत. आजपर्यंत पोलिसांच्या आरोग्यासाठी बऱ्याच संकल्पना राबवण्यात आल्या. मात्र, सध्याच्या घडीला अनेक योजना कागदावरच राहिल्या आहेत. त्यांचा उपयोग पोलिसांना घेता येत नाही. आता महाराष्ट्रात  नवे सरकार स्थापन झाले आहे. तेव्हा नव्या मुख्यमंत्र्यांनी पोलीस खातेतंर्गत असलेले अनेक प्रलंबित निर्णय, ८तास कर्तव्याचे जीआर, पोलीस रुग्णालयांची बिकट अवस्था यांसह पोलिसांच्या अनेक अडचणी दूर कराव्यात अशी अपेक्षा आहे. या सरकारकने पोलिसांसाठी आनंदाचे दिवस आणावेत. पोलीस तणावमुक्त राहीले तर राज्यात कायदा-सुव्यवस्था राखण्यात नव्या सरकारला सुुुकर होईल.