२५ जून, २०१९

कामगारांचे आरोग्य जपा


दादर रेल्वे पोलीस ठाणेची उत्तम कामगिरी

दादर रेल्वे पोलीस ठाणेची उत्तम कामगिरी 

दादासाहेब येंधे, मुंबई : घटना कोणतीही असो, पोलीस पुन्हा एकदा आपल्या ब्रिदवाक्यानुसार मुंबईकरांच्या मदतीस धावून आले. मंगळवार दिनांक २५/०६/२०१९ रोजी मध्य रेल्वेच्या दादर रेल्वे स्थानकावर सकाळी १०.०५ वाजता फलाट क्रं. ३ वर आलेल्या सीएसएमटी कडे जाणाऱ्या धीम्या लोकल मधून एक महिला प्रवाशी डब्यातून उतरत असताना अचानक तिला चक्कर आली.
भांडुप येथे राहणाऱ्या निकिता दिघे, वय अंदाजे २५ वर्षे. या कामानिमित्त सीएसएमटी कडे लोलकने प्रवास करत होत्या. दादर स्टेशनवर उतरत असताना अचानक त्यांना चक्कर आली. ही घटना कळताच चार महिला पोलीस त्या लोकल जवळ पोहोचल्या.
प्रसंगी दादर रेल्वे पोलिस ठाणेचे व्हिजिबल पोलिसिंग मध्ये समावेश असलेल्या महिला पोलीस यांनी क्षणाचाही विलंब न करता तसेच स्ट्रेचर व हमाल येण्याची वाट न पाहता तात्काळ सर्व महिला पोलिसांनी सदर आजारी महिलेस उचलून फलाट  क्रं. ३/४ वरून फलाट क्रं. ६ वरील आकस्मिक रुग्णालय येथे उपचाराकरिता घेऊन गेल्या. डॉक्टरांनी  त्या महिलेवर तात्काळ उपचार केले असता तिला सौम्य हृदयविकाराचा झटका येऊन गेला होता. तिच्यावर प्राथमिक उपचार करून नंतर तिला सोडून देण्यात आले.  असे पोलीस निरीक्षक श्री. प्रसाद पांढरे यांनी सांगितले.
महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी दाखविलेल्या प्रसंगावधानाबद्दल व केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांचे सर्व थरांतून कौतुक होत आहे. एका महिला प्रवाशाचे प्राण वाचविल्याकरीता दादर रेल्वे स्थानकात उभ्या असलेल्या प्रवाशांनी पोलिसांचे कौतुक करीत त्यांना 'सॅल्यूट' ठोकला आहे.


दादर रेल्वे पोलीस ठाणेतील महिला पोलीस सदर महिलेस उचलून डॉक्टरकडे घेऊन जात असताना


मुंबईत आझाद मैदानात धरणं आंदोलन

मुंबईत आझाद मैदानात धरणं आंदोलन
दादासाहेब येंधे, मुंबई: मराठी भाषेचा अडकलेला अभिजात दर्जा, बंद पडणाऱ्या मराठी शाळा, शालेय पातळीवर मराठी अभ्यास न करण्यासाठी मिळणारी सवलत या पार्श्वभूमीवर 'मराठीच्या भल्यासाठी' या व्यासपीठाखाली एकत्र आलेल्या विविध संस्थांनी नुकतेच आझाद मैदानात आंदोलन केले. 
मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीसाठी काम करणाऱ्या महाराष्ट्रातील २० संस्थांनी एकत्र येऊन 'मराठीच्या भल्यासाठी' हे व्यासपीठ निर्माण केलं आहे. या व्यासपीठाच्या वतीने मराठीच्या संदर्भात विविध मागण्यांसाठी मुंबईत आझाद मैदानात धरणं आंदोलन आयोजित करण्यात आले होते.  मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबईच्या वतीने संघाध्यक्ष रवींद्र मालुसरे, कार्याध्यक्ष रमेश सांगळे,कार्यवाह नितीन कदम,सुनील कुवरे, अरुण खटावकर, नारायण परब, गुरुनाथ तिरपणकर,विलास खानोलकर, रामचंद्र जयस्वाल, उमाकांत सावंत, दादासाहेब येंधे आदी लेखक हे मोठया संख्येने उपस्थित होते.

१३ जून, २०१९

सुविधाही मिळाव्यात


महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघातर्फे संदीप माळवदे यांना पुरस्कार प्रदान

मुंबई: महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे १४ वे राज्यस्तरीय अधिवेशन जळगांव येथील कांताई सभागृहात नुकतेच पार पडले. या राज्यस्तरीय अधिवेशनास मा. खासदार रक्षाताई खडसे, राज्य सहकार मंत्री गुलाबराव पाटील, जळगांव च्या महापौर सौ. सीमाताई घोळे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. उज्ज्वला ताई पाटील तसेच  राज्य मराठी पत्रकार संघाचे सर्व प्रमुख पदाधिकार्यांच्या उपस्थितीत राज्य स्तरावर उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने मुंबई विभागीय अध्यक्ष पत्रकार संदीप मोहन माळवदे यांचा मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. प्रसंगी मुंबईचे पत्रकार श्री. उमेश कुडतडकर तसेच आदी पत्रकार मोठया संख्येने उपस्थित होते. अशी माहिती दादासाहेब येंधे यांनी दिली आहे.
१० जून, २०१९

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे अधिवेशन संपन्न २०१९

जळगाव येथे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे १४ वे अधिवेशन संपन्न
मुंबई: महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे १४ वे अधिवेशन जळगाव येथील कांताई सभागृहात पार पडले. या राज्यस्तरीय अधिवेशनास माननीय खासदार रक्षाताई खडसे, राज्य सहकारमंत्री गुलाबराव पाटील, जळगावच्या महापौर सीमाताई घोळे, जिल्हापरिषदेच्या अध्यक्षा उज्वलाताई पाटील, महाराष्ट्र पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष श्री. राजा माने, राज्यसंघटक संजयजी भोकरे, प्रदेश अध्यक्ष श्री. वसंतराव मुंडे, राज्यसरचिटणीस श्री. विश्वासराव आरोटे, माजी आमदार श्री. गिरीश चौधरी, लोकमत वृत्तपत्राचे निवासी संपादक मिलिंद कुलकर्णी, संघटनेचे राज्यातील जिल्हा अध्यक्ष, उपाध्यक्ष, तालुका अध्यक्ष व पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.
प्रथम सत्रात लोकमतचे निवासी संपादक मिलिंद कुलकर्णी यांनी माध्यमाचे बदलते स्वरूप या विषयावर चर्चासत्रात उपस्थितांना मार्गदर्शन केले. दोन सत्रात पार पडलेल्या या कार्यक्रमात मान्यवरांच्या सत्कारानंतर पार पडलेल्या द्वितीय सत्रात प्रास्ताविक करताना संघटक श्री. संजय भोकरे यांनी पत्रकारांना भेडसावणाऱ्या समस्या व पत्रकारांवर वेळोवेळी होणारे जीवघेणे हल्ले याबद्दल कायद्याला दिल्लीत मान्यता मिळाली नसल्याचे खासदार रक्षाताई खडसे यांना सांगितले. तसेच पत्रकारांना जोखीम म्हणून दहा लाखाचे विमा कवच द्यावे. अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना टोलमुक्ती द्यावी, पत्रकारांवर दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावेत. यासह विविध मागण्यांचा ठराव पत्रकार संघाचे प्रदेश कार्याध्यक्ष वसंतराव मुंडे यांनी या आदिवेशनात मांडले. उपस्थितांनी सर्व ठराव मंजूर केले. प्रसंगी व्यासपीठावर हजर असलेले आमदार गुलाबराव पाटील व खासदार रक्षाताई खडसे यांनी पत्रकारांच्या या सर्व मागण्या आम्ही सरकारपर्यंत पोहोचवू व त्या मंजूर करण्याची ग्वाही त्यांनी दिली. यावेळी पत्रकारितेत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व पत्रकारितेचा नावलौकिक वाढविणाऱ्या राज्यातील गुणवंत पत्रकारांचा सत्कार करण्यात आला अशी माहिती दादासाहेब येंधे यांनी दिली आहे.