२५ ऑक्टोबर, २०१९

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस लोहमार्ग पोलीस ठाणे येथे हुतात्मा दिन साजरा

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस लोहमार्ग पोलीस ठाणे येथे हुतात्मा दिन साजरा

दादासाहेब येंधे, मुंबई: हुतात्मा दिनाच्या निमित्ताने CSMT रेल्वे पोलीस ठाणे समोरील प्रांगणात दि.26/11/2008 रोजी मुंबईत झालेल्या अतिरेकी हल्यात शहीद झालेले पोलीस निरीक्षक शशांक चंद्रसेन शिंदे यांची प्रतिमा ठेवून त्यास पुष्पहार अर्पण करण्यात येवून श्रद्धांजली वाहण्यात आली.
         सदर वेळी लोहमार्ग पोलीस आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त श्री.रविंद्र सेनगावकर, पोलीस उपायुक्त, मध्य परिमंडळ श्री.एम्.एम्.मकानदर, पोलीस उपायुक्त पश्चिम  परिमंडळ श्री.प्रदीप चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त,CSMT विभाग श्री.पाटील, वरिष्ठ पोलीस  निरीक्षक,CSMT रेल्वे पोलीस ठाणे श्री.हेमंत बावधनकर व इतर अधिकारी उपस्थित होते.
   प्रसंगी लोहमार्ग पोलीस आयुक्तालयात शहीद झालेले पोलीस निरीक्षक शशांक चंद्रसेन शिंदे ,पोलीस हवालदार सुहास ईश्वरा जाधव व पोलीस शिपाई रामदास रोहिदास हराळे यांना आपले कर्तव्य बजावताना आलेल्या वीरमरन व शौर्या बाबत माहिती सर्वाना देण्यात आली त्यानी बजावलेल्या शौर्यास सलाम करुन,त्यांचे पवित्र स्मृतिस अभिवादन करण्यात येवून श्रद्धांजलि वाहण्यात आली.


- Dadasaheb Yendhe