२४ मार्च, २०२१

कलावंतांसाठी वसतिगृह उभारा

 

धूमधडाका चित्रपटात आपल्या सहज सुंदर अदाकारीने तात्कालीन मराठी प्रेक्षकांचे लक्ष वेधलेल्या तर भटक भवानी चित्रपटात नायिकेचे काम करून आपल्या अभिनयाने लोकप्रिय ठरलेल्या किंबहुना ज्यांच्यावर चित्रित झालेले प्रियतमा हे गीत आजही ताजेतवाने वाटते. या गीताच्या नायिका ऐश्वर्या राणे मात्र वयाच्या ६७ व्या वर्षी जगण्यासाठी जीवनाच्या उत्तरायणात रस्त्यावर हात पसरून मदतीची याचना करत आहे. ही बातमी शोचनीय आहे. कलावंत मग तो लहान असो वा मोठा की देशाची, राज्याची श्रीमंती असते, वैभव असते, शान असते. समाज त्यांचा देणेकरी असतो असे म्हटल्यास वावगे ठरू नये. म्हणूनच अशा कलावंतांना दुर्दैवाने आलेले दिवस भोगावे लागू नयेत, आपले उरलेले ज्येष्ठत्वाचे जीवन समाधानाने जगता यावे यासाठी राज्य सरकारने अशा कलावंतांचा शोध घेऊन त्यासाठी ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे. केवळ पेन्शन दिले की कर्तव्य संपत नाही. किंबहुना वार्धक्यात एकाकी जगणाऱ्यांचे जीवन अतिशय कष्टदायक आणि भीषण स्वरूपाचे होते. शासनाने अशा कलावंतांसाठी कलावंत वसतिगृह उभरावीत. जेणेकरून, जीवनसंध्या शाप ठरलेल्या जिवांना ते वरदान ठरावे. -दादासाहेब येंधे, काळाचौकी, मुंबई

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा