२५ जून, २०१९

दादर रेल्वे पोलीस ठाणेची उत्तम कामगिरी

दादर रेल्वे पोलीस ठाणेची उत्तम कामगिरी 

दादासाहेब येंधे, मुंबई : घटना कोणतीही असो, पोलीस पुन्हा एकदा आपल्या ब्रिदवाक्यानुसार मुंबईकरांच्या मदतीस धावून आले. मंगळवार दिनांक २५/०६/२०१९ रोजी मध्य रेल्वेच्या दादर रेल्वे स्थानकावर सकाळी १०.०५ वाजता फलाट क्रं. ३ वर आलेल्या सीएसएमटी कडे जाणाऱ्या धीम्या लोकल मधून एक महिला प्रवाशी डब्यातून उतरत असताना अचानक तिला चक्कर आली.
भांडुप येथे राहणाऱ्या निकिता दिघे, वय अंदाजे २५ वर्षे. या कामानिमित्त सीएसएमटी कडे लोलकने प्रवास करत होत्या. दादर स्टेशनवर उतरत असताना अचानक त्यांना चक्कर आली. ही घटना कळताच चार महिला पोलीस त्या लोकल जवळ पोहोचल्या.
प्रसंगी दादर रेल्वे पोलिस ठाणेचे व्हिजिबल पोलिसिंग मध्ये समावेश असलेल्या महिला पोलीस यांनी क्षणाचाही विलंब न करता तसेच स्ट्रेचर व हमाल येण्याची वाट न पाहता तात्काळ सर्व महिला पोलिसांनी सदर आजारी महिलेस उचलून फलाट  क्रं. ३/४ वरून फलाट क्रं. ६ वरील आकस्मिक रुग्णालय येथे उपचाराकरिता घेऊन गेल्या. डॉक्टरांनी  त्या महिलेवर तात्काळ उपचार केले असता तिला सौम्य हृदयविकाराचा झटका येऊन गेला होता. तिच्यावर प्राथमिक उपचार करून नंतर तिला सोडून देण्यात आले.  असे पोलीस निरीक्षक श्री. प्रसाद पांढरे यांनी सांगितले.
महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी दाखविलेल्या प्रसंगावधानाबद्दल व केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांचे सर्व थरांतून कौतुक होत आहे. एका महिला प्रवाशाचे प्राण वाचविल्याकरीता दादर रेल्वे स्थानकात उभ्या असलेल्या प्रवाशांनी पोलिसांचे कौतुक करीत त्यांना 'सॅल्यूट' ठोकला आहे.


दादर रेल्वे पोलीस ठाणेतील महिला पोलीस सदर महिलेस उचलून डॉक्टरकडे घेऊन जात असताना


३ टिप्पण्या: