३ जुलै, २०१९

मोफत वह्या वाटप कार्यक्रम संपन्न

मोफत वह्या वाटप कार्यक्रम संपन्न
मुंबई, (दादासाहेब येंधे): विद्यार्थी जीवनात मुले शिक्षणापासून दूर जाऊ नयेत. त्यांना वेळेत शैक्षणिक साहित्य उपलब्ध व्हावे या हेतूने प्रेरित होऊन कै. अंबरनाथ नर यांच्या स्मृती प्रित्यर्थ माननीय समाजसेवक सत्यवान नर यांच्या हस्ते रविवारी (३० जून २०१९ रोजी) कल्याण येथील शाळेत मोफत शैक्षणिक साहित्याचे मोफत वाटप करण्यात आले.
मुंबई पासून हाकेच्या अंतरावर असलेल्या कल्याण येथील अंतरली गावात जिल्हा प्राथमिक शाळेमध्ये इयत्ता पहिली ते पाचवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. सोबतच पर्यावरण संवर्धन विषयक माहिती देऊन शाळेतील आवारात विद्यार्थ्यांना सोबत घेऊन वृक्षारोपण करण्यात आले. प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री. सोनावणे सर, श्री. पांचाळ सर, तसेच कार्यक्रमाचे प्रमुख संयोजक सत्यवान नर समवेत हेमंत मकवाना , विनायक येंधे, अमित पवार, दत्तायत्र माने, गिरीश मकवाना, गणेश क्षीरसागर, गणेश काळे, प्रशांत हांदे, नागेश तांदळेकर, महेश पटेल, शंकर साळवी, रोहन परब, साहेबराव शिंदे, राजन आंबेरकर, श्रेयस घाटकर, दत्ता कोरडे, रवी जाधव, विकी जैन, श्रीकांत चौरसिया, तुषार घाडी, नवनाथ पानसरे, रामचंद्र राणे, विजय शिर्के, संदीप सकपाळ, श्लोक नर, दर्श मकवाना, रंगारी बदक चाळीतील कार्यकर्ते तसेच अंतरली गावातील ग्रामस्थ मंडळी आदी मान्यवर मोठया संख्येने उपस्थित होते.






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा