१४ ऑगस्ट, २०१९

चिंचपोकळी चिंतामणीचे जल्लोषात आगमन

चिंचपोकळी चिंतामणी मंडळाचे शतक महोत्सवी वर्ष असल्याने रविवारी पार पडलेल्या आगमन सोहळ्यात विविध ठिकाणांहून गणेशभक्तांनी हजेरी लावली होती. दुपारी सुरू झालेल्या या आगमन सोहळ्यासाठी रविवारी सकाळपासूनच गणेशभक्तांनी चिंचपोकळी मंडळाचे टी-शर्ट परिधान केलेले तरुण-तरुणींचे गट चिंचपोकळी-करीरोड रेल्वे स्थानकांवर येत होते. चिंचपोकळीच्या आर्थर पूल धोकादायक असल्याने त्या ठिकाणी गर्दी करू नये, असा आदेश देऊनही तरुण मोठया प्रमाणात पुलावर गर्दी करताना दिसत होते. काळाचौकी पोलिसांनी पुढाकार घेत गर्दीवर नियंत्रण मिळवले. यावर्षी एक हजाराहून अधिक कार्यकर्त्यांची फौज पोलिसांच्या दिमतीला हजर होती. अशी माहिती मंडळाचे हितचिंतक दादासाहेब येंधे यांनी दिली असून काही तुरळक घटना वगळता सांयकाळी ७ वाजता चिंतामणी गणपती ने मंडपात प्रवेश केला. महाराष्ट्रात उदभवलेल्या पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी चिंचपोकळी मंडळाने पाच लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री सहायता निधीसाठी जाहीर केली आहे. असे मंडळाचे अध्यक्ष श्री. उमेश नाईक यांनी सांगितले आहे.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा