२६ ऑगस्ट, २०१९

गणेशमूर्त्या मंडपाकडे निघाल्या

गणेशमूर्त्या मंडपाकडे निघाल्या
गणेशोत्सव अवघ्या एका आठवड्यावर येऊन ठेपल्याने मुंबईचे वातावरण आता बाप्पामय झाले आहे. मुंबई तसेच उपनगरातील चाळीसहून अधिक छोट्या-मोठ्या मंडळांच्या मिरवणुका रविवारी निघाल्याने लालबाग-परळ परिसर गणेश भक्तांनी अक्षरशः फुलून गेला होता. मंडपातील सजावटीच्या दृष्टीने बहुतांश सार्वजनिक मंडळांचे गणपती बाप्पा रविवारी मंडपाकडे रवाना होताना दिसून येत होते. या सर्व मिरवणुका कुठलाही अनुचित प्रकार न घडता पार पडल्या. यावेळी काही बेशिस्त दुचाकीस्वरांमुळे वाहतुकीचे नियोजन करताना पोलिसांची मात्र दमछाक होताना दिसत होती. यंदा मूर्तिकारांनी गणेश मूर्तीबाबत वेगळा प्रयोग केल्याने रविवारच्या मिरवणुकांमध्ये अनेक गणेश मुर्ती विशेष लक्षवेधी ठरत होत्या. ड्रॅगन वर बसलेला बाप्पा, गरुडावर विराजमान झालेला विष्णू, श्रीशंकर, हनुमान आदी देवतांच्या रूपांतील विविध मूर्तींचा यात समावेश होता.कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा