अमेरिकेतील 'मराठी कल्चर अँड फेस्टिव्हल' दिवाळी अंकास उत्कृष्ट अंक पुरस्कार
अमेरिकेतून प्रकाशित होणाऱ्या 'मराठी कल्चर अँड फेस्टिव्हल' या दिवाळी अंकाला मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई या संघाच्या वतीने आयोजित केलेल्या ४४ व्या राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धेत उत्कृष्ट दिवाळी अंक म्हणून नुकतेच पुरस्काराने गौरविण्यात आले. लॉस एंजलीस येथे वास्तव्यास असणाऱ्या ऐश्वर्या कोकाटे या अंकाच्या संपादिका आहेत. गेली चार वर्षे हा अंक प्रकाशित होत आहे. स्वान्त सुखाय या उद्देशाने सुरु केलेला या उपक्रमासाठी त्यांनी जगातील समविचारी आणि समभाषिक लोकांना लिखाणासाठी साद घातली त्याला उदंड प्रतिसाद देत
न्यु जर्सी, लॉस एंजलीस, गिलबर्ट्स,सॅन फ्रान्सिस्को, लंडन, आफ्रिका,कॅनडा, सिंगापूर, जर्मनी या ठिकाणच्या परदेशातील अनेक मराठी माणसांनी कथा,कविता, लेख,आठवणी लिहून पाठविल्या होत्या. विशेषतः महिला व लहान मुलांच्या लेखनास या अंकात अधिक वाव देण्यात आला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा