६ ऑगस्ट, २०१९

आर्या मेमाने हिने कांस्यपदक पटकावले

आर्या मेमाने हिने कास्यपदक पटकावले

दादासाहेब येंधे ,मुंबई: साऊथ कोरिया येथे नुकत्याच पार पडलेल्या तायक्वांडो या कराटे प्रकारात जिऑजू व ग्वानजु ओपन इंटरनॅशनल तायक्वांडो चॅम्पियनशिप ही स्पर्धा नुकतीच पार पडली. या स्पर्धेत जगभरातून २४ देशांनी सहभाग नोंदवला होता. सदर स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणारी मुंबईतील आग्रीपाडा येथे राहणारी कुमारी आर्या मेमाने वय वर्ष ७ हिने या स्पर्धेत जिऑनज याठिकाणी बी श्रेणी मध्ये भारताला तिसरे स्थान मिळवून देत कांस्यपदक पटकावले. तर ग्वानज या ठिकाणी देखील तिने अथक परिश्रम करीत अ श्रेणी मध्ये बाजी मारत तिसरे स्थान मिळवून पुन्हा एकदा कास्य पदक पटकावले. सदर कामगिरी करिता तिला जालनावाला स्पोर्ट्स ट्रेनिंग रिसर्च सेंटर मास्टर श्री. निलेश अशोक जालनावाला यांचे आणि तिचे प्रशिक्षक श्री. रोहिदास शिर्के व श्री. नवीन दवे यांचे उत्तम मार्गदर्शन व प्रशिक्षण लाभले आहे. कुमारी आर्या ही इयत्ता ३री मध्ये सेंट जोसेफ हायस्कूल आग्रीपाडा येथे शिकत आहे. मुंबई पोलिस दलात दक्षिण नियंत्रण कक्ष वायरलेस विभागात कार्यरत असलेल्या श्रीमती. रिद्धी गणेश मेमाने यांच्या कन्येच्या या अभूतपूर्व यशाबद्दल पोलीस दलात तिचे कौतुक होत आहे.


२ टिप्पण्या: