८ नोव्हेंबर, २०१९

श्री सोमजाई फाउंडेशन तर्फे आदिवासी पाड्यात दिवाळी साजरी..

श्री सोमजाई फाउंडेशन तर्फे आदिवासी पाड्यात दिवाळी साजरी..

दादासाहेब येंधे, रायगड: समाजातील सगळ्याच घटकातील वेगवेगळ्या सण-उत्सवांचा आनंद समान पद्धतीने  करता यावा,या उद्देशाने दिवाळी निमित्ताने श्री सोमजाई फाउंडेशन या सामाजिक संस्थे तर्फे आदिवासीपाडा येथे फराळ व कपडे वाटप करण्यात आले.२२५ कुटुंबियांना फराळ व ६०० लोकांना कपडे वाटप करण्यात आले. हे कार्यक्रम सावर आदिवासी वाडी,चिखलप आदिवासी वाडी,साई आदिवासी वाडी आणि मांजरवणे आदिवासी वाडी या ठिकाणी जाऊन दि.२ नोव्हेंबर २०१९ रोजी पार पडले.
या प्रसंगी अध्यक्ष -बबन चिले,जेष्ठ समाजसेवक बाबाजी रिकामे,विजय धुमाळ,अनंत रिकामे,लक्ष्मण महाडीक,जय खेडेकर,शांताराम पवार,यशवंत पवार,राम अंबिके,विनोद शिगवण,मनोज धुमाळ,नामदेव महाडीक,चंद्रकांत घोले,विशाल घाटवल,चंद्रवदन महाडीक,नागेश महाडीक,राजेंद्र महाडीक,उमेश घोले,मंगेश चिले,पांडुरंग महाडीक,कल्पेश महाडीक,भावेश महाडीक,राहुल महाडीक, पूजा घोले,भरत घोले,तेजस दर्गे,प्रणिता महाडीक,मनाली घोले,मानसी महाडीक,शुभम तटकरे,ओमकार घोले,विमल महाडीक,मनीषा महाडीक,प्रसाद चव्हाण,कल्पेश मुंडे,विरेन तायडे आदी उपस्थित होते.

                             

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा