३ डिसेंबर, २०१९

पोलिसांच्या अडचणी दूर कराव्यात

पोलिसांच्या अडचणी दूर कराव्यात
मुंबई, दादासाहेब येंधे: कायदा व सुव्यवस्था सांभाळत असताना पोलीस व त्यांचे कुटुंबीय विविध आजारांनी त्रस्त आहेत. पोलिसांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी पोलीस रुग्णालये उभारण्यात आली. मात्र, या रुग्णालयांची अवस्था अतिशय बिकट आहे. रुग्णालयांत औषधांचा तुटवडा आहे. अस्वच्छता आहे. अशा परिस्थितीत पोलीस आणि त्यांच्या कुटुंबियांचे आजार बरे होण्याऐवजी दुसऱ्याच आजाराची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आज घडीलाही पोलिसांना स्वतःच्या हक्कांसाठी लढण्यासाठी संघटना काढण्यास सरकारकडून परवानगी देण्यात आली नाही. आठ तास कामाच्या योजनेचाही बट्ट्याबोळ झालाय. पोलीस वेळेवर घरी पोहचत नाहीत त्यामुळे वेळेवर जेवण, औषध-पाणी घेता येत नाही. कुटुंबाकडे लक्ष देता येत नाही. परिणामी, पोलीस आणि त्यांचे नातेवाईक अस्वस्थ बनताहेत. आजपर्यंत पोलिसांच्या आरोग्यासाठी बऱ्याच संकल्पना राबवण्यात आल्या. मात्र, सध्याच्या घडीला अनेक योजना कागदावरच राहिल्या आहेत. त्यांचा उपयोग पोलिसांना घेता येत नाही. आता महाराष्ट्रात  नवे सरकार स्थापन झाले आहे. तेव्हा नव्या मुख्यमंत्र्यांनी पोलीस खातेतंर्गत असलेले अनेक प्रलंबित निर्णय, ८तास कर्तव्याचे जीआर, पोलीस रुग्णालयांची बिकट अवस्था यांसह पोलिसांच्या अनेक अडचणी दूर कराव्यात अशी अपेक्षा आहे. या सरकारकने पोलिसांसाठी आनंदाचे दिवस आणावेत. पोलीस तणावमुक्त राहीले तर राज्यात कायदा-सुव्यवस्था राखण्यात नव्या सरकारला सुुुकर होईल.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा