शिवछाया को. ऑप.क्रेडिट सोसायटीचा रौप्य महोत्सव साजरा
मुबई, दादासाहेब येंधे: शिवछाया क्रेडिट को. ऑप. क्रेडिट सोसायटी चा रौप्य महोत्सवी वर्ष सोहळा नुकताच मुबईत घाटकोपर येथे संपन्न झाला. मुंबई शहरात नोकरी, व्यवसायानिमित्त, शिक्षणासाठी जुन्नर तालुक्यातील हिवरे खुर्द गावातून आलेल्या होतकरू तरुणांनी जनसामान्यांच्या उन्नत्तीसाठी सहकार या एकमेव उद्दीष्ठाने, पंचवीस वर्षांपूर्वी लावलेल्या रोपट्याचे आज वटवृक्षात रूपांतर झाले आहे. एकेकाळी समाजातील शेतकरी सावकारी कर्जात अडकला असताना, गरीब, गरजू शेतकऱ्यांना सहकारी संस्थेच्या माध्यमातून पतपुरवठा व्हावा, म्हणून स्थापन झालेल्या या सहकारी पतपेढीच्या आज तीन अद्ययावत शाखा कार्यरत असून सोसायटीचे १६०० सभासद आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. सुरेश जाधव होते. तसेच उपाध्यक्ष श्री. विलास गं. येंधे, मानद सचिव श्री. रावजी भि. वायकर, कार्याध्यक्ष श्री. गोविंद जाधव, सचिव रौप्य महोत्सव समिती श्री. अनिल कि. येंधे, श्री. गंगाराम गे. लोखंडे, संचालिका सौ. सुचिता सं. जाधव, सौ.सुलोभना भा. येंधे, तज्ञ संचालक (बँक) श्री. विलास रो. येंधे आदी आजी-माजी पदाधिकारी, हितचिंतक तसेच हिवरे खुर्द येथील ग्रामस्थ, सभासद मोठया संख्येने उपस्थित होते. रौप्य महोत्सव सोहळ्यानिमित्त मनोरंजनपर कलारंजना मुंबई प्रस्तुत-मराठी पाऊल पडते पुढे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला प्रेक्षक म्हणून उपस्थित असलेल्या सभासदांनी भरभरून प्रतिसाद दिला. सोसायटीने रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त स्मरणिका व नवीन वर्षाच्या दिनदर्शिकेचे उदघाटन केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा