२३ जुलै, २०१९

विद्यार्थी गुणगौरव व हेल्मेट वाटप सोहळा संपन्न

विद्यार्थी गुणगौरव व हेल्मेट वाटप सोहळा संपन्न
सिर सलामत तो पगडी पचास याप्रमाणे प्रत्येकाने हेल्मेटचा वापर जर केला तर घटने प्रसंगी हेल्मेटमुळे आपले डोके वाचले तर माणूस संकटातून बाहेर पडू शकतो. त्यामुळे सर्वांनी राज्य शासनाने सुरू केलेली योजना म्हणजेच प्रत्येकाने हेल्मेटचा वापर नक्की करावा. कारण अपघातांमध्ये डोक्याला इजा पोहोचली तर माणूस दगावू शकतो. मात्र हेल्मेट घालून दुचाकीवर प्रवास करत असताना पुढे व मागे असणाऱ्या दोघांनीही हेल्मेटचा जरूर वापर करावा. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाने गेल्या दोन वर्षांपासून पत्रकारांसाठी मोफत हेल्मेट हे अभियान सुरु केले. या अभियानाचा नक्कीच आमच्यासारख्या अधिकारीवर्गाला देखील अभिमान वाटतो असे येथे उपस्थित असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते साहेब यांनी देखील या अभियानाचे कौतुक केले त्यांच्याहस्ते देखील पुणे येथील भोसरी अधिवेशनात पत्रकारांना हेल्मेट वाटप करण्यात आले. त्यामध्ये महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या उपक्रमाचे राज्यभरात कौतुक होत असले तरीही या संघाने पत्रकार हा देखील एक समाजसेवक असून त्यांच्या कार्यातून नक्कीच वेगवेगळे आदर्श उपक्रम राबवत असून आज नवी मुंबई भागातील गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी मोफत शालेय साहित्य तसेच इयत्ता दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा याठिकाणी संपन्न झाला. हा सोहळा हा या विद्यार्थ्यांना भावी काळात आपल्या स्वतःच्या पायावर उभे राहून इतर विद्यार्थ्यांनी या विद्यार्थ्यांचा आदर्श घ्यावा असे आव्हान उप प्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र सावंत, यांनी काल नवी मुंबई कोपरखैरणे येथे स्वामी विवेकानंद विद्यालयात आयोजित कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले.  यावेळी व्यासपीठावर महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे महासचिव विश्वासराव आरोटे कोकण विभागीय अध्यक्ष भगवान  चंदे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूर्यकांत जगदाळे, पोलीस निरीक्षक बी औटी, ठाणे जिल्हा सचिव नरेश पाटील, बाळासाहेब ठाकरे ॲकडमी संचालक कीशोर शेवाळे, जेष्ठ पत्रकार बाळासाहेब मिरजे, स्वामी विवेकानंद विद्यालयाचे मुख्याध्यापक ज्योती सिंग महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष राजेंद्र बोडके सरचिटणीस प्रवीण हांडे, खजिनदार दशरथ चव्हाण,आदी उपस्थित होते , यावेळी प्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास प्रारंभ झाला. यावेळी नवी मुंबई परिसरातील गोरगरीब विद्यार्थ्यांची उपस्थिती लक्षणीय होती तर आरोटे यांनी बोलताना सांगितले की पत्रकार हा देखील एक समाजसेवक असून पत्रकारांकडे पाहण्याचा दृष्टिकोन काही लोकांचा वेगळा असला तरी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या माध्यमातून राज्यभरात या उपक्रमाचे आयोजन केले जात असून गेल्या अठरा ते वीस वर्षांपासून या कार्यक्रमांचे संपूर्ण राज्यभरात वितरण केले जाते महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवित असताना पत्रकारितेचा माध्यमातून सर्वसामान्य जनतेचे प्रश्न व त्याचबरोबर आपण समाजासाठी काहीतरी देणे लागतो ही उदांत भावना मनी धरली तर सर्व काही सुरळीत असते अधिकारी व पत्रकार यांच्यामधील नेहमीचा संपर्क यामुळेच आजच्या कार्यक्रमाला अधिकार यांची असलेली उपस्थिती ही सर्वांना नक्कीच चकित करणारी ठरेल मात्र विद्यार्थ्यांनी देखील त्यांच्या हस्ते आज आपला सन्मान झाला आहे त्या अधिकाऱ्यांचा आदर्श ठेवला तर नक्कीच उद्याच्या आदर्श भारताचे नागरिक आपण व्हाल. असे उपस्थितांना संबोधित करताना म्हटले. राज्य मराठी पत्रकार संघाच्या ध्येय धोरणानुसार राज्य पत्रकार संघाच्या माध्यमातून राज्यभरात या अभियानाचा प्रारंभ गेल्या एक महिन्यापासून सुरू असून संपूर्ण राज्यभरात गुणवंत विद्यार्थी गवळी मोफत शालेय साहित्य वाटप व मोफत हेल्मेट वाटप हे अभियान सुरू करून राज्याचे राज्य संघटक संजय भोकरे राज्याध्यक्ष राजमाने कार्याध्यक्ष वसंतराव मुंडे प्रदेश प्रसिद्धीप्रमुख नवनाथ जाधव यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरात हा सोहळा संपन्न होत असून पत्रकारांनी देखील चांगल्या कामाचे कौतुक करतात. त्या दृष्टीने आपण देखील आपल्या लिखाणातून दर्जेदार लिखाण करून सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचे काम केले पाहिजे असे आव्हान विश्वास आरोटे यांनी व्यक्त केले तर कोकण विभागीय अध्यक्ष भगवान शिंदे यांनी आपल्या मार्मिक पाषाणातून विद्यार्थ्यांनी आदर्श अधिकाऱ्यांचा आदर्श मनी ठेवून आपल्या आई-वडिलांचे स्वप्न अंगीकारून उद्याचा आदर्श अधिकारी जरी होता आले नाही तरीही आदर्श उद्योजक आदर्श शेतकरी आदर्श व्यापारी हे होण्याचे स्वप्न मनी बाळगावे, एवढे करून कुठेही यश मिळाले नाही तरी आदर्श पेपर वितरण हे देखील काम आपण करू शकता या देशाचे राष्ट्रपती डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांनी देखील पेपर वितरण करून आपले शिक्षण पूर्ण केले व वडिलांना मदत केली आणि या देशाचे राष्ट्रपती होण्याचे स्वप्न त्यांनी साकार केले म्हणून विद्यार्थ्यांनी आदर्श कुणाचा तरी डोळ्यासमोर ठेवून आपले काम करावे असे सांगितले. यावेळी सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये गोरगरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व मोफत पत्रकारांना हेल्मेट वाटप करण्यात आले यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नवी मुंबई जिल्हाध्यक्ष राजेंद्र बोडके यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रविण हांडे,तर स्वागत खजिनदार दशरथ चव्हाण , आभार जिल्हा उपाध्यक्ष कुंडलिक कानगुडे यांनी मानले तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी संजय नरवडे, प्रमोद माने, अशोक लांडगे , दिनकर गायकर,खंडु घुले, धनंजय कुरकटे, अशोक काळे, संजय म्हात्रे,दिलीप म्हात्रे ,रवी वाळुंज, अविनाश आरोटे, दिनेश पाटील,दत्ता गायकवाड, विजय जुनघरे,आदिंनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. अशी माहिती दादासाहेब येंधे यांनी दिली आहे.
कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा