२३ जुलै, २०१९

श्रीपंत भक्त मंडळ आयोजित गुरुपौर्णिमा महोत्सव


मुंबई,दादासाहेब येंधे : श्रीपंत भक्त मंडळ मुंबई आयोजित गुरुपूर्णिमा उत्सव  मेळावा व शतकोत्तर  रौप्य महोत्सवी वर्ष आरती अवधूत महासोहळा  रविवार दिनांक २१ जुलै रोजी ना. म. जोशी मार्ग सेकंडरी स्कूल डेलाईल  रोड येथे  राज्यभरातील हजारो  पंत भक्तांच्या उपस्तिथीत  पार पडला.  तदप्रसंगी उत्सवाची सुरुवात श्रीपंत महारांजांच्या नामस्मरनाणे झाली, यानंतर  सीतामाई  महिला भजन  मंडळ व अण्णा वारंगे भजन मंडळ , आणि श्री सुहास सतोसकर  (सावंतवाडी ) यांच्या सुमधुर आवाजानि भक्तगणांनी कीर्तनाचा आनंद लुटला, तसेच  बाबा सुर्वे , विवेक वैद्य , सुधीर वैद्य , भालचंद्र वांगणेकर यांचे  भक्तगनाना आरती अवधुतावर बोधविचार देण्यात आले. संध्याकाळी ७ वाजता  श्री पंत महाराज लिखित जय जय आरती अवधूत। या आरतीने  उत्सवाची सांगता  करण्यात आली. सदर मंडळाचे  अध्यक्ष  देवदास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा संपन्न  झाला. यावेळी  जीवनगौरव , क्रीडा विशेष , आणि विद्यार्थी गुणगौरव  पुरस्कार देण्यात आले प्रसंगी  दत्ता सातोसे, अभिजित पंत आदी उपस्थित होते.


३ टिप्पण्या:

  1. गुरुपासूर्णिमेच्या शुभेच्छा! सदर मंडळाने छान उपक्रम राबविला आहे.

    उत्तर द्याहटवा
  2. विद्यार्थी गुणगौरव सारखे उपक्रम राबवून श्रीपंत भक्त मंडळ चांगले काम करीत आहे. शुभेच्छा!💐💐

    उत्तर द्याहटवा