१९ नोव्हेंबर, २०१९

रंगारी बदक चाळीत बालदिन उत्साहात साजरा

रंगारी बदक चाळीत बालदिन उत्साहात साजरा
मुंबई, (दादासाहेब येंधे): काळाचौकी येथील रंगारी बदक चाळीच्या पटांगणात पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त बालदिन  नवबालक क्रीडा मंडळाचे प्रमुख विश्वस्त श्री. अनिल हेलेकर यांच्या मार्गदर्शनाखाली मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी अध्यक्षस्थानी श्री. महेश पांगे, कार्याध्यक्ष पावसकर, सरचिटणीस राजमाने, खजिनदार सुनील घाडीगांवकर तसेच स्वागताध्यक्ष श्री. मंगेश सकपाळ हे होते. बालदिनाच्या निमित्ताने मुलांनी विविध खेळण्यांचा मनमुराद आनंद लुटला. यावेळी मुलांना खाऊवाटपही करण्यात आले. प्रसंगी आमदार यामिनी यशवंत जाधव तसेच स्थानिक नगरसेवक श्री. रमाकांत रहाटे यांनी कार्यक्रमाला हजेरी लावून मुलांना शुभाशिर्वाद दिले.

२ टिप्पण्या:

  1. छान बातमी छापून आली आहे. आम्हालासुद्धा असे लिहावेसे वाटते.पण, लिहिता येत नाही. आपले सामाजिक विषयांवरील लेखसुद्धा मी वाचतो.आपण कुठल्याही प्रसिद्धीचा देखावा न करता सामाजिक विषयांना विविध वृत्तपत्रांत मांडून त्या सोडवून घेता. त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. लाडका लंबोदर आपल्याला उदंड आयुष्य देवो.

    उत्तर द्याहटवा