रंगारी बदक चाळ लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
रंगारी बदक चाळ लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

१० डिसेंबर, २०१९

रंगारी बदक चाळ येथे दत्तजयंती उत्सवाचे आयोजन

रंगारी बदक चाळ येथे दत्तजयंती उत्सवाचे आयोजन
मुंबई, (दादासाहेब येंधे): काळाचौकी येथील रंगारी बदक चाळीच्या पटांगणात नवबालक क्रीडा मंडळ यांच्यावतीने श्री दत्तजयंती उत्सव, श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन ११ डिसेंबर रोजी करण्यात आले आहे. यानिमित्ताने दत्तजयंती उत्सवाचे औचित्य साधून सकाळी ९.०० ते रात्रौ ९.०० वा.पर्यंत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मंडळाचे प्रमुख विश्वस्त श्री. अनिल हेलेकर यांच्या उपस्थितीत सदर कार्यक्रम साजरा होणार असून दत्तगुरूंच्या पादुकांचे पूजन सकाळी ९ वाजता, होमहवन सकाळी १० ते दुपारी १.०० वाजता, श्रीसत्यनारायची पूजा दुपारी २.०० वाजता, महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ संध्याकाळी ५.०० वाजता  आयोजित करण्यात आला आहे. सत्कार मूर्तींचा सत्कार, समणिका प्रकाशन तसेच २०२० च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात येणार आहे. या उत्सवात मोठया संख्येने सहभागी होण्याचे आवाहन मंडळाचे अध्यक्ष श्री. सुनिल पावसकर, कार्याध्यक्ष सुनिल घाडीगांवकर, सरचिटणीस सचिन राजमाने, कोषाध्यक्ष दयानंद घाडीगांवकर तसेच स्वागताध्यक्ष योगेश राणे यांनी केले आहे.







१९ नोव्हेंबर, २०१९

रंगारी बदक चाळीत बालदिन उत्साहात साजरा

रंगारी बदक चाळीत बालदिन उत्साहात साजरा
मुंबई, (दादासाहेब येंधे): काळाचौकी येथील रंगारी बदक चाळीच्या पटांगणात पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त बालदिन  नवबालक क्रीडा मंडळाचे प्रमुख विश्वस्त श्री. अनिल हेलेकर यांच्या मार्गदर्शनाखाली मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी अध्यक्षस्थानी श्री. महेश पांगे, कार्याध्यक्ष पावसकर, सरचिटणीस राजमाने, खजिनदार सुनील घाडीगांवकर तसेच स्वागताध्यक्ष श्री. मंगेश सकपाळ हे होते. बालदिनाच्या निमित्ताने मुलांनी विविध खेळण्यांचा मनमुराद आनंद लुटला. यावेळी मुलांना खाऊवाटपही करण्यात आले. प्रसंगी आमदार यामिनी यशवंत जाधव तसेच स्थानिक नगरसेवक श्री. रमाकांत रहाटे यांनी कार्यक्रमाला हजेरी लावून मुलांना शुभाशिर्वाद दिले.

















३० सप्टेंबर, २०१९

रंगारी बदक चाळीची दुर्गामाता

रंगारी बदक चाळीची दुर्गामाता
मुंबई: रंगारी बदक चाळ, काळाचौकी येथील समर्थ हनुमान मंडळातर्फे दरवर्षी नवरात्रौत्सवात मोठया उत्साहात साजरा करण्यात येत असून हिंदू-मुस्लीम, गुजराती, मराठी, बंगाली अशा सर्व धर्मीयांची मंडळी या देवीला साकडे घालण्यासाठी नवरात्र उत्सवात गर्दी करताना दिसून येतात. विशेष म्हणजे या मातेचे कधीही विसर्जन होत नाही. श्री समर्थ हनुमान मंडळ काळाचौकी यांचेतर्फे दरवर्षी नवरात्रोत्सवा दरम्यान महिलांकडून मोठया प्रमाणात देवीच्या नावाचा जप (नामस्मरण) करून घेतला जातो. महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ, संगीत खुर्ची, पाककला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, लहान मुलांसाठी बडबड गीते, कॅरम -बुद्धिबळ, चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा घेण्यात येणार आहे. भजन तसेच गरबा-दांडिया रास आयोजन करण्यात आले आहे. सदर मंडळात तरुण-तरुणींचा मोठया प्रमाणात सहभाग असून मंडळाचे अध्यक्ष श्री. दत्ता झोडगे, कार्याध्यक्ष श्री. भाऊ पार्टे, सरचिटणीस श्री. संतोष परब, खजिनदार श्री. नागेश नागवेकर आदींच्या मार्गदर्शनाखाली नवरात्रौत्सव यावर्षी अधिक उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. अशी माहिती मंडळाचे प्रसिद्धीप्रमुख दादासाहेब येंधे यांनी दिली असून दि. ०६ ऑक्टोबर २०१९ रोजी भंडारा व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.



















२ सप्टेंबर, २०१९

रंगारी बदक चाळीत यंदा रायगड किल्ल्यातून भारतीय शूर जवानांना मानवंदना

रंगारी बदक चाळीत यंदा रायगड किल्ल्यात भारतीय शूर जवानांना मानवंदना
रंगारी बदक चाळ रहिवासी संघ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यंदा ८० व्या वर्षात पदार्पण करीत आहे. समुद्रमंथनातून प्राप्त झालेला अमृतकुंभ दानवरूपी नागाने पळविला होता. तो विष्णूचे वाहन असलेल्या गरुडाने पुन्हा आणून दिला. त्या दानवरूपी नागावर बाप्पाची सुंदर अशी मूर्ती आरूढ आहे. यावर्षी मंडळाने रायगड किल्ल्याची प्रतिकृती साकारली आहे. रायगड ही शिवकालीन महाराष्ट्राची राजधानी. त्याच रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा संपन्न झाला. या किल्ल्याची प्रतिकृती उत्सवाच्या दर्शनी भागात सादर करण्यात आली आहे. किल्ल्याच्या प्रवेशद्वारातून प्रवेश केल्यानंतर आपण थेट जातो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारात हीसुद्धा राजदरबाराची प्रतिकृती आहे. जसं शिवराज्याच्या वेळी न्याय मागण्यासाठी रयत म्हणजे जनता महाराजांकडे जात होती ती कल्पना केंद्रस्थानी ठेऊन महाराष्ट्रात महाभयंकर  अस्मानी संकटामुळे जो सांगली, कोल्हापूर येथे  महाप्रलय आला तसा महाप्रलय महाराष्ट्रात पुन्हा होऊ नये आणि झालाच तर यशस्वीपणे त्याचा मुकाबला करण्याची ताकत महाराष्ट्रात येऊ दे अशी कल्पना श्री गणपतीला साक्षात छत्रपती शिवाजी महाराज समजून केली आहे. नव्हे तसे साकडे घातले आहे अशी माहिती मंडळाचे प्रसिद्धीप्रमुख दादासाहेब येंधे यांनी दिली असून महाराष्ट्र आलेल्या महापुराच्या संकटात भारतीय सेनेने पुरात अडकलेल्यांना सहाय्य करून पुराच्या पाण्यातून सुखरूप बाहेर काढले याच्या विविध प्रतिमा दरबारात लावण्यात आल्या असून एक प्रकारे रंगारी बदक चाळ गणेशोत्सव मंडळाने भारतीय सेनेला सलामच केलेला आहे. मंडळाचे अध्यक्ष श्री. भाई मयेकर, कार्याध्यक्ष श्री. अनिल हेलेकर, सरचिटणीस श्री. दत्ता झोडगे, खजिनदार श्री. शंकर साळवी यांच्या संकल्पनेतून सदर कथानक सादर करण्यात येत आहे.
आजपर्यंत संत साहित्य, संतांची परंपरा, सामाजिक तसेच नैतिक मूल्यांची जोपासना करणारे विविध आकर्षक देखावे मंडळाने सादर केले आहेत. लोकसहभागातून लोक विकास राष्ट्रविकास या लोकमान्य टिळकांच्या संकल्पनेनुसार मंडळाने राष्ट्रीय भावना लोकांमध्ये रुजावी, नागरिकांचे आरोग्य उत्तम राहावे यासाठी स्वच्छता मोहीम, आरोग्य शिबिरे, राबवली जात आहे. वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, एकांकिका, वेशभूषा, स्मरणशक्ती स्पर्धा अशा विविध स्पर्धांतून मुलांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा म्हणून रंगारी बदक चाळ रहिवासी संघ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ विविध स्पर्धांचे दरवर्षी आयोजन करीत असते.  
















१५ ऑगस्ट, २०१९

रंगारी बदक चाळीत ७३ वा स्वातंत्र्यदिन साजरा

मुंबई, दादासाहेब येंधे: रंगारी बदक चाळ रहिवासी संघ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने ७३ वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सीमेचे संरक्षण करणारे रंगारी बदक चाळीचे सुपुत्र भारतीय सैनिक अतुल सतीश परुळेकर यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. प्रसंगी मंडळाचे अध्यक्ष श्री. भाई मयेकर, सेक्रेटरी श्री. दत्ता झोडगे, कार्याध्यक्ष श्री. अनिल हेलेकर,  खजिनदार श्री. शंकर साळवी तसेच अनिल घाडी, शाम आचरेकर, जयंत साखरकर, विनायक येंधे, सुनील डीचोलकर, दयानंद घाडी, प्रफुल्ल, प्रकाश पेडणेकर, नागेश तांदळेकर, संतोष सकपाळ आदी कार्यकर्ते तसेच शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ध्वजारोहण झाल्यानंतर शालेय विद्यार्थ्यांना व लहान मुलांना खाऊ वाटप करण्यात आला.




१ ऑगस्ट, २०१९

पाणीगळती रोखा


पाणीगळती रोखा
मुंबई, दादासाहेब येंधे : काळाचौकी येथील रंगारी बदक चाळीच्या मुख्य गेटवर ड्रेनेज लाइनचे काम सुरु असताना पाइपलाइनला गळती लागली आहे. ड्रेनेजचे काम होऊन सुद्धा अजूनही पाणी गटारीतून वाहत आहे. रहिवाशांना पदपथावरून नीट चालताही येत नाही. एकीकडे पाणी टंचाई आहे तर दुसरीकडे पिण्याचे पाणी गटारीतून वाहत आहे. तरी महानगरपालिकेने पाणी गळती रोखावी.




२५ जुलै, २०१९

रंगारी बदक चाळ गणेशोत्सव मंडळ कमिटी स्थापन





रंगारी बदक चाळ रहिवाशी संघ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ कमिटी स्थापन

आदर्श कथानकांचे सादरीकरण करणारा व ती परंपरा जोपासणारा अशी ख्याती असलेल्या काळाचौकी या कामगार विभागातील रंगारी बदक चाळ रहिवाशी संघ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे यंदाचे ८० वर्ष मोठ्या जल्लोष साजरे होणार असून सन २०१९-२० या वर्षाकरिता नवीन कार्यकारिणी जाहीर झाली असून अध्यक्ष श्री. भाई मयेकर, कार्याध्यक्ष श्री. अनिल हेलेकर,  श्री. दत्ता झोडगे सरचिटणीस तसेच श्री. शंकर साळवी खजिनदार यांची सर्वानुमते निवड झाली आहे. अशी माहिती मंडळाचे प्रसिद्धीप्रमुख दादासाहेब येंधे यांनी दिली आहे.

१८ जुलै, २०१९

मोफत वह्या वाटप व विद्यार्थी गुणगौरव सोहळा

मुंबई, दादासाहेब येंधे: कै. अंबरनाथ नर यांच्या स्मरणार्थ गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून रंगारी बदक चाळ, श्रीकृपा बिल्डिंग काळाचौकी येथे समाजसेवक श्री. सत्यवान नर यांचेतर्फे वह्या वाटप करण्यात आल्या.
यानिमित्त महाराष्ट्र राज्याचे शिक्षणमंत्री नामदार श्री. आशिष शेलार यांच्या शुभहस्ते सदर कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले. इयत्ता १ ली ते १५ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप व वह्या वाटप करण्यात आल्या. कार्यक्रमदरम्यान हेमंत मकवाना, विनायक येंधे, अमित पवार, दत्तात्रय माने, गणेश काळे, संतोष सकपाळ, विकी जैन, प्रविण पावसकर, दया घाडी, सदाशिव गोनबरे, नागेश तांदळेकर, रवी जाधव, राजन आंबेरकर, शंकर साळवी, राकेश पवार तसेच रंगारी बदक चाळीतील मित्र परिवार मोठया संख्येने उपस्थित होता.