१० डिसेंबर, २०१९

रंगारी बदक चाळ येथे दत्तजयंती उत्सवाचे आयोजन

रंगारी बदक चाळ येथे दत्तजयंती उत्सवाचे आयोजन
मुंबई, (दादासाहेब येंधे): काळाचौकी येथील रंगारी बदक चाळीच्या पटांगणात नवबालक क्रीडा मंडळ यांच्यावतीने श्री दत्तजयंती उत्सव, श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन ११ डिसेंबर रोजी करण्यात आले आहे. यानिमित्ताने दत्तजयंती उत्सवाचे औचित्य साधून सकाळी ९.०० ते रात्रौ ९.०० वा.पर्यंत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मंडळाचे प्रमुख विश्वस्त श्री. अनिल हेलेकर यांच्या उपस्थितीत सदर कार्यक्रम साजरा होणार असून दत्तगुरूंच्या पादुकांचे पूजन सकाळी ९ वाजता, होमहवन सकाळी १० ते दुपारी १.०० वाजता, श्रीसत्यनारायची पूजा दुपारी २.०० वाजता, महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ संध्याकाळी ५.०० वाजता  आयोजित करण्यात आला आहे. सत्कार मूर्तींचा सत्कार, समणिका प्रकाशन तसेच २०२० च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात येणार आहे. या उत्सवात मोठया संख्येने सहभागी होण्याचे आवाहन मंडळाचे अध्यक्ष श्री. सुनिल पावसकर, कार्याध्यक्ष सुनिल घाडीगांवकर, सरचिटणीस सचिन राजमाने, कोषाध्यक्ष दयानंद घाडीगांवकर तसेच स्वागताध्यक्ष योगेश राणे यांनी केले आहे.कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा