कल्पतरू समूहाच्या रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
दादासाहेब येंधे, मुंबई: चिंचपोकळी (पू) येथील कल्पतरू समूहातर्फे नुकत्याच पार पडलेल्या २८ व्या रक्तदान शिबिरात १२२ रक्तदात्यांनी रक्तदान करून भरघोस प्रातिसाद दिला. या कार्यक्रमास वार्प इंजिनियरींग या कंपनीचे डायरेक्टर श्री. प्रभूदास गोला यांनी उपस्थिती लावून मंडळाची शिस्त व रक्तदान शिबिराचे सातत्य याविषयी तोंडभरून कौतुक केले. २८ वर्षे रक्तदान शिबिर राबवून सातत्य राखणे व कोणत्याही पक्षाचा, संघटनेचा पाठिंबा न घेता विविध कार्यक्रम राबविणे तेही निःस्वार्थपणे हे फक्त कल्पतरू समूहच करू शकते असे समूहाला संबोधताना श्री. रोहिदास लोखंडे म्हणाले. तर रंगारी बदक चाळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष श्री. भाई मयेकर यांनी मंडळाला संबोधतांना म्हटले की या विभागातील इतर सर्व मंडळे कल्पतरू समूहाच्या समाजसेवेचा आदर्श घेत आहेत. ही मोठी कौतुकाची बाब आहे.
सदर रक्तदान शिबिर यशस्वी होण्यासाठी विठ्ठल पै, शेखर साळसकर, शिवाजी पाटील, सुजित, महेश नानचे, स्वप्नील परब, सुनिकेत, श्री. बाळा परब, आनंदा पाटील, संजीव केरकर, चारुदत्त लाड, श्री. शिवणेकर, संतोष रायकर, आदित्य देसाई, विकास सक्रे, विनायक येंधे, समीर नाईक तसेच सौ. करुणा, वर्षा पाटील, अश्विनी, वैष्णवी, अर्चना, वनिता साळसकर आदी कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली.
Well done Dadasaheb nice coverage news. Good job by kalpataru samuha and associates. Our best wishes to you and kalpataru group. Keep it up this social work and help society.
उत्तर द्याहटवाGood. Dadaji Keep it up.
उत्तर द्याहटवा