चिंचपोकळी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
चिंचपोकळी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

८ मार्च, २०२०

कल्पतरू समूहाच्या रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

कल्पतरू समूहाच्या रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
दादासाहेब येंधे, मुंबई: चिंचपोकळी (पू) येथील कल्पतरू समूहातर्फे नुकत्याच पार पडलेल्या २८ व्या रक्तदान शिबिरात १२२ रक्तदात्यांनी रक्तदान करून भरघोस प्रातिसाद दिला. या कार्यक्रमास वार्प इंजिनियरींग या कंपनीचे डायरेक्टर श्री. प्रभूदास गोला यांनी उपस्थिती लावून मंडळाची शिस्त व रक्तदान शिबिराचे सातत्य याविषयी तोंडभरून कौतुक केले. २८ वर्षे रक्तदान शिबिर राबवून सातत्य राखणे व कोणत्याही पक्षाचा, संघटनेचा पाठिंबा न घेता विविध कार्यक्रम राबविणे तेही निःस्वार्थपणे हे फक्त कल्पतरू समूहच करू शकते असे समूहाला संबोधताना श्री. रोहिदास लोखंडे म्हणाले. तर रंगारी बदक चाळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष श्री. भाई मयेकर यांनी मंडळाला संबोधतांना म्हटले की या विभागातील इतर सर्व मंडळे कल्पतरू समूहाच्या समाजसेवेचा आदर्श घेत आहेत. ही मोठी कौतुकाची बाब आहे.
सदर रक्तदान शिबिर यशस्वी होण्यासाठी विठ्ठल पै, शेखर साळसकर, शिवाजी पाटील, सुजित, महेश नानचे, स्वप्नील परब, सुनिकेत, श्री. बाळा परब, आनंदा पाटील, संजीव केरकर, चारुदत्त लाड, श्री. शिवणेकर, संतोष रायकर, आदित्य देसाई, विकास सक्रे, विनायक येंधे, समीर नाईक तसेच सौ. करुणा, वर्षा पाटील, अश्विनी,  वैष्णवी, अर्चना, वनिता साळसकर आदी कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली.


























२० फेब्रुवारी, २०१९

चिंचपोकळी येथे हरिनाम कीर्तन सप्ताह संपन्न - दादासाहेब येंधे

चिंचपोकळी येथे हरिनाम कीर्तन सप्ताह संपन्न
मुंबई: ज्ञान, कर्म, भक्ती आणि उपासना यांची सांगड घालून आपल्या प्रापंचिक जीवनाचा उद्धार करण्यासाठी माणसाला गरज असते. ती अध्यात्माची गरज म्हणूनच न्यू सातारा समुह ग्रुप ऑप को ऑपरेटिव्हज, मुंबई तसेच चिंचपोकळी सा. उत्सव मंडळ, कामगार कल्याण मंडळ व बाबा महाराज सातारकर ज्ञानपीठ प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने लालबाग येथील भालचंद्र महाराज क्रीडांगण येथे नुकताच हरिनाम कीर्तन सप्ताह (द्वितपपूर्ती सोहळा) संपन्न झाला. 
सदर कार्यक्रमादरम्यान ह.भ. प. श्री. बाबमहाराज सातारकर, ह.भ. प. सौ. भगवतीबाई सातारकर व ह. भ. प. चिन्मय महाराज सातारकर यांचे सुश्राव्य कीर्तन झाले. न्यू सातारा समूहाने सुरू केलेल्या हरिनामाचा जागर काल्याच्या किर्तनाने सांगता झाली. गेल्या २४ वर्षांपासून हा कीर्तन हरिनाम सप्ताह मोठया उत्साहात साजरा होत आहे. दरम्यान जमलेल्या सर्व वारकऱ्यांनी मेणबत्या पेटवून पुलवामा येथे शहीद झालेल्या सैनिकांना श्रद्धांजली वाहिली. गिरणगावातील भाविक भक्तांनी कीर्तन सोहळ्याला मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. अशी माहिती चिंचपोकळी मंडळाचे हितचिंतक दादासाहेब येंधे यांनी दिली आहे.