पोलीसांनी गाण्यातून दिला घरात बसण्याचा महत्त्वाचा संदेश
मुंबई, दादासाहेब येंधे: कोरोना या विषाणूवर मात करण्यासाठी सरकार तसेच प्रशासनाने कंबर कसली आहे. नागरिकांनी नियमांचे पालन करून सरकार आणि प्रशासनाला साथ द्यावी, असे आवाहन वारंवार करण्यात येत आहे. संचारबंदी, लॉक डाऊनच्या काळात कुणीही घराबाहेर पडू नये अशा सूचनाही पोलिसांमार्फत वायरलेस गाडीवरून गल्लो-गल्ली फिरून देण्यात येत आहे.
माननीय मुुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आरोग्यमंत्री हेही राज्यातील जनतेला वेळोवेळी मार्गदर्शन करीत आहेत. विविध वृत्तपत्रांतून, न्यूज चॅनेलमधून, बातम्यांतून पत्रकारही जनजागृती करत आहेत.
माननीय मुुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आरोग्यमंत्री हेही राज्यातील जनतेला वेळोवेळी मार्गदर्शन करीत आहेत. विविध वृत्तपत्रांतून, न्यूज चॅनेलमधून, बातम्यांतून पत्रकारही जनजागृती करत आहेत.
यातच राज्याच्या पोलीस दलातील काही पोलीस बांधवांनी वेगळी शक्कल लढवली आहे. गाण्याच्या माध्यमातून नागरिकांमध्ये कोरोना विषाणूसंदर्भात जनजागृती करून घराबाहेर न पडण्याचे अनोखे आवाहन करताना दिसून येत आहे.
'घरात बसा, रोडवर फिरता कशाला...
कोरोना होईल रोगानं या मरता कशाला...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा