पोलीस लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
पोलीस लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

२२ फेब्रुवारी, २०२१

भिकाऱ्यांचे उच्चाटन ही काळाची गरज

 

मुंबई, दिल्ली, कोलकाता आदी शहरांत तसेच मोठमोठी मंदिरे असणाऱ्या ठिकाणी भिकाऱ्यांची वाढती संख्या हा सध्या चिंतेचा विषय बनत चालला आहे. अशा भिकाऱ्यांना पकडण्यासाठी पोलीस सामाजिक सामाजिक संस्थांची मदत घेत असतात आणि त्यांना पकडून सुधारगृहात पाठवितात. कधीकधी लहान मुलांना अपहरण करून किंवा चोरी करून आणून भीक मागण्यास बसविले जाते किंवा सिग्नलवर उभे केले जाते. लहान मुलांचे अपहरण करणाऱ्या टोळ्या नेस्तनाबूत करणे गरजेचे आहे. आज घडीला मुंबईत सिग्नल, मंदिर, मस्जिद, चर्चच्या समोर भिकाऱ्यांनी ठाण मांडलेले दिसून येते. सिग्नलवर तर कारचालकाकडे, गाडीत बसलेल्यांकडे हात पुढे करताना कित्येकजण दिसून येतात. तर गाडी अडविल्याचेही कित्येककदा दिसून येते. मुंबईतील भिकाऱ्यांची संख्या वाढून न देणे, त्यांचे समूळ उच्चाटन करणे ही काळाची गरज आहे. सिग्नल, मंदिरे, मशिदी, चर्च, रेल्वे स्थानाके, टोल नाके ही भिकाऱ्यांची हात पसरायची मुख्य ठिकाणे आहेत. अशा ठिकाणांवर स्थानिक संस्था, एनजिओंची मदत घेऊन पोलिसांनी भिकाऱ्यांवर कारवाई करणे आवश्यक आहे.-दादासाहेब येंधे, काळाचौकी, मुंबई 

२ एप्रिल, २०२०

धक्कादायक ! लोहमार्ग पोलिसाला कोरोनाची लागण


पोलीसांनी गाण्यातून दिला घरातच बसण्याचा संदेश

पोलीसांनी गाण्यातून दिला घरात बसण्याचा महत्त्वाचा संदेश
मुंबई, दादासाहेब येंधे: कोरोना या विषाणूवर मात करण्यासाठी सरकार तसेच प्रशासनाने कंबर कसली आहे. नागरिकांनी नियमांचे पालन करून सरकार आणि प्रशासनाला साथ द्यावी, असे आवाहन वारंवार करण्यात येत आहे. संचारबंदी, लॉक डाऊनच्या काळात कुणीही घराबाहेर पडू नये अशा सूचनाही पोलिसांमार्फत वायरलेस गाडीवरून गल्लो-गल्ली फिरून देण्यात येत आहे.
माननीय मुुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आरोग्यमंत्री हेही राज्यातील जनतेला वेळोवेळी मार्गदर्शन करीत आहेत. विविध वृत्तपत्रांतून, न्यूज चॅनेलमधून, बातम्यांतून पत्रकारही जनजागृती करत आहेत.
यातच राज्याच्या पोलीस दलातील काही पोलीस बांधवांनी वेगळी शक्कल लढवली आहे. गाण्याच्या माध्यमातून नागरिकांमध्ये कोरोना विषाणूसंदर्भात जनजागृती करून घराबाहेर न पडण्याचे अनोखे आवाहन करताना दिसून  येत आहे. 
'घरात बसा, रोडवर फिरता कशाला...
कोरोना होईल रोगानं या मरता कशाला...








२८ मार्च, २०२०

पोलीसांतील माणुसकीचे दर्शन

संचारबंदीत पोलीसांतील माणुसकीचे दर्शन
दादासाहेब येंधे, मुंबई: करोना या विषाणूच्या पार्श्वभूमीवर देशात विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या टवाळखोरांना पोलीस फटक्यांचा प्रसाद देताना सर्वांनी पाहिले. विविध सोशल मीडियावर ते व्हिडिओ शेअरही केले. पण, याच कठोर वाटणाऱ्या पोलिसांची माणुसकी कुणालाही दिसत नाही. 
शहरात रस्त्यावरील छोट्या-मोठ्या खाऊगल्ल्या, हातगाड्या, हॉटेल बंद झाल्यामुळे रस्त्यावरील भिकाऱ्यांचे, गरिबांचे हाल सुरू झाले आहेत. लॉकडाऊनमुळे  त्यांच्या उपजीविकेची सर्व संसाधने बंद झाली आहेत. अशा गरिबांना मास्क वाटप करून त्यांना जेवण देऊन पोलीस दल आपली माणुसकी जपत असल्याचे चित्र जणू दिसून येत आहे.





रस्त्यावरील गरीब व्यक्तीला जेवण देताना, जोगेश्वरी, मुंबई

रस्त्यावरील गरिबांना मास्क देताना

मास्क वाटप



























३ डिसेंबर, २०१९

पोलिसांच्या समस्या सोडवा


पोलिसांच्या अडचणी दूर कराव्यात


नव्या सरकारने पोलिसांच्या अडचणी दूर कराव्यात


१७ नोव्हेंबर, २०१९

स्वरतरंग कार्यक्रमाला राज्यपालांनी लावली हजेरी

स्वरतरंग कार्यक्रमाला राज्यपालांनी लावली हजेरी
दादासाहेब येंधे (मुंबई): मुंबई पोलीस आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी असलेल्या 'स्वरतरंग २०१९' या कार्यक्रमाचे आयोजन मुंबईमध्ये करण्यात आले होते. हा कार्यक्रम मुंबई पोलिसांसाठी फार मोठा वार्षिक सोहळा असतो. प्रत्येक मुंबई पोलीस या कार्यक्रमाची आतुरतेने वाट पाहत असतो. नुकत्याच पार पडलेल्या या कार्यक्रमाला चित्रपटसृष्टीतील दिगग्ज कलाकारांनी हजेरी लावली होती. २४ तास जनतेचे संरक्षण करीत त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नेहमीच तत्पर राहणाऱ्या पोलिसांसाठी 'स्वरतरंग' हा कार्यक्रम म्हणजे मोठी पर्वणीच असते. 
बृहन्मुंबई पोलिसांच्या 'स्वरतरंग २०१९' या कार्यक्रमास राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी सदर कार्यक्रमाला भेट देऊन उपस्थित पोलीस व त्यांच्या कुटुंबियांना शुभेच्छा दिल्या. पोलीस जिमखाना, मरीन ड्राईव्ह येथे आयोजित स्वरतरंग कार्यक्रमास मुंबई पोलीस संजय बर्वे, सह पोलीस आयुक्त नवल बजाज, विनयकुमार चौबे, उपायुक्त एन. अंबिका आदी उपस्थित होते. मुंबई पोलीस आयुक्त श्री. संजय बर्वे यांनी राज्यपाल श्री. कोश्यारी यांचे स्वागत केले.
सदर कार्यक्रमादरम्यान 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमाच्या कलाकारांनी सादरीकरण केले. तसेच विविध गाण्यांवर मराठी चित्रपट सृष्टीतील कलाकारांनी नृत्ये व गीते सादर केली. अभिनेता अभिजित खांडकेकर व मृण्मयी देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले.