११ एप्रिल, २०२०

गृहनिर्माण सोसायट्यांकडून कोरोनाला 'नो एन्ट्री'

गृहनिर्माण सोसायट्यांकडून कोरोनाला 'नो एन्ट्री'
मुंबई, दादासाहेब येंधे : कोरोना या विषाणूला थोपविण्यासाठी मुंबई शहर आणि उपनगरांत विविध उपाययोजना युद्धपातळीवर राबविल्या जात असतानाच काळाचौकी येथील श्रीकृपा हौ. सोसायटी, रंगारी बदक चाळ गणेशोत्सव मंडळ, ओमकार रहिवाशी संघ सोसायटी आदींनी कोरोनाला सोसायटीबाहेरच ठेवण्यासाठी पुढाकार घेताना दिसत आहेत.
सोसायटीमधील पदाधिकारी व्हॉट्सअपच्या माध्यमातून राहिवाश्यांसोबत संपर्क साधत पदाधिकारीही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारी आदेशांचे पालन करीत विविध उपक्रम राबवत कोरोनाविरोधातील लढ्यात आपले योगदान देत आहेत. 


श्रीकृपा हौ. सोसायटीचे अध्यक्ष श्री. लक्ष्मण देवरुखकर, सेक्रेटरी श्री. संतोष सकपाळ, गणेश काळे, महेश पांगे यांनी सांगितले की, आम्ही स्वतःच क्वारंटाईन होऊन आम्ही आमच्या सोसायटीत कोरोनाचा शिरकाव होऊ देणार नाही. आमच्या सोसायटीने तातडीने उपाययोजना म्हणून सोसायटीचे मुख्य गेट बंद केले आहे. तसेच सोसायटीच्या मुख्य गेटमधून आत येताना गेटवर जीवन प्रबोधिनी ट्रस्ट तर्फे हात धुण्यासाठी पाणी व सॅनिटायझर उपलब्ध करून दिले आहे.

 ओमकार रहिवाशी संघ या सोसायटीचे पदाधिकारी श्री. नरेंद्र पांगे, घाडीगांवकर यांनीही खबरदारी म्हणून सोसायटीचे मुख्य गेट बंद केल्याचे सांगितले.


 तसेच गेटवर नागरिकांनी स्वतःची कोरोनापासून वाचण्यासाठी काय काळजी घ्यावी याचा बोर्डदेखील लावल्याचे सांगितले. तर रंगारी बदक चाळ सार्वजनिक गणेशोत्सतव मंडळातर्फे मुख्य गेटच्या समोर उड्डाणपुलाच्या पिलरवर कोरोना या विषाणूपासून घाबरून न जाता स्वतःची काय काळजी घ्यावी याची सविस्तर माहिती तसेच राज्यस्तरीय नियंत्रण कक्ष नंबर, टोल फ्री नं., राष्ट्रीय कॉल सेंटर क्रमांकाचा बोर्ड लावण्यात आला आहे.३ टिप्पण्या:

  1. वृत्त लेखन सुंदर केले आहे

    उत्तर द्याहटवा
  2. आपल्या सोसायटीच्या तसेच गल्लीतील सर्व कार्यकर्त्यांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे.

    उत्तर द्याहटवा
  3. आपल्या सोसायटीच्या तसेच गल्लीतील सर्व कार्यकर्त्यांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे.

    उत्तर द्याहटवा