मुंबईच्या महापौर पुन्हा नर्सच्या गणवेशात
मुंबई, दादासाहेब येंधे: देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत कोरोनाबाधितांचा आकडा एकीकडे वाढत असताना दुसरीकडे मात्र मुंबईतल्या आरोग्य सेवेवर मोठा ताण पडत आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन मुंबईच्या महापौर कीशोरीताई पेडणेकर यांनी नुकतीच नायर रुग्णालयात जाऊन वैद्यकीय कर्मचाऱ्यांची भेट घेतली.
महापौर किशोरी पेडणेकर यांनी आधी परिचारिका म्हणून काम केलं आहे. अनेक वर्षे शिवसेनेच्या नगरसेवक राहिलेल्या पेडणेकर सध्या मुंबईच्या महापौर म्हणून कार्यरत आहेत. सध्या कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मुंबईतील महापालिकेच्या रुग्णालयांत कोरोनाबधितांवर उपचार सुरू आहेत. इथल्या कर्मचाऱ्यांवर कामाचा मोठा ताण पडत आहे. याच गोष्टीचे गांभीर्य लक्षात घेऊन नायर रुग्णालयातील डॉक्टर, नर्स आणि इतर कर्मचाऱ्यांचा हुरूप वाढविण्यासाठी कोशोरीताई परिचारिका घालत असलेला गणवेश परिधान करून नायर रुगण्यात आल्या होत्या. यावेळी त्यांनी येथील वैद्यकीय कर्मचाऱ्यांना त्यांनी काही सूचनाही केल्या.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा