३ मे, २०२०

लॉक डाऊनच्या काळात अल्कोहोलिक्स अनॉनिमसद्वारे प्रभावी उपाययोजना

लॉक डाऊनच्या काळात अल्कोहोलिक्स अनॉनिमसद्वारे प्रभावी उपाययोजना
 मुंबई, दादासाहेब येंधे : अनामिक मद्यपी (अल्कोहोलिक्स अनॉनिमस - ए. ए. ) ही बंधुभाव संस्था पूर्वाश्रमीचे मद्यपी आणि त्यांच्या कुटुंबियांना जगभरात स्थापित असलेल्या समुहांद्वारे अल्कोहोलिक्स अनॉनिमस च्या कार्यक्रमाद्वारे आशा आणि मुक्तता प्रदान करते. जगभरामध्ये ए ए च्या मीटिंग सर्वसाधारणपणे अनेक ठिकाणी जसे की शाळा, रुग्णालये, महाविद्यालये आणि संबंधित संस्थांमध्ये आयोजित केल्या जातात. अशाप्रकारे कोट्यवधी मद्यपी मद्यपान करण्यापासून दूर  झाले आहेत.  तथापि, या वेळी कोरोना साथीच्या आजारामुळे, सामाजिक अंतर दूर ठेवण्याच्या सूचनांमुळे सर्व सभा आणि संमेलन स्थाने बंद पडली आहेत.  यामुळे मोठ्या प्रमाणावर व्यत्यय आला आहे. ज्यामुळे एए संदेश प्रसारित करण्याच्या पद्धतींमध्ये तात्काळ बदल करण्यात आला आहे. मद्यापासून दूर राहून सुधारणेचा कार्यक्रम व संदेश देण्यासाठी इतर पर्यायी साधनांद्वारे जसे की ऑनलाईन मीटिंग बाबत ए ए ने जागतिक पातळीवर पाऊल टाकले आहे. भारतात या संस्थेने अनेक राज्यांमध्ये विविध भाषांमध्ये २०० ऑनलाईन सभा सुरू केल्या आहेत.  मुंबई आणि उर्वरित महाराष्ट्रात २५ ऑनलाईन मीटिंगज आहेत.  दारू थांबविण्याची ज्यांची इच्छा आहे आणि थांबलेली दारू थांबलेलीच रहावी अशा व्यक्ती या ऑनलाईन मीटिंग मध्ये भाग घेऊ शकतात.  या मीटिंग पूर्णपणे विनामूल्य आणि निनावी आहेत. (फक्त ऑडियो ) कोणत्याही व्यक्तीचे व्हिडिओ सदर संस्था प्रसारित करत नाही. आपल्या गुप्ततेची पूर्णपणे काळजी घेतली जाते व  कोणतेही व्हिडिओ रेकॉर्डिंग केले जात  नाहीत.
सध्या काही पिणाऱ्या व्यक्तींनी अचानक दारू पिणे थांबवल्यामुळे त्यांना होणारा त्रास व  स्वतःचे बरे वाईट करून घेणे, अशा अनेक घटना घडल्या आहेत आणि अशा रूग्णांना वैद्यकीय चिकित्सक, मानसोपचारतज्ज्ञ आणि रूग्णालयात भरती करणे असे उपाय सुचविणे  आवश्यक आहे.

याकरिता शासनाने हेल्पलाईन उपलब्ध करून दिल्या आहेत. अल्कोहोलिक्स अनॉनिमस या बंधुभाव संस्थेनेही महाराष्ट्रभर स्वतःची हेल्पलाइन तयार केली आहे. ज्या व्यक्तींना दारू पिणे थांबविण्याची इच्छा आहे. अशा व्यक्ती व त्या व्यक्तीचे कुटुंबीय, यांना ए.ए. बद्दल अधिक माहिती हवी असल्यास व ए ए  कसे कार्य करते हे जाणून घेण्यासाठी  संस्थेच्या ऑनलाइन सभांना उपस्थित राहू शकतात किंवा ए.ए. च्या सदस्यांशी बोलू शकतात. जगातील कोट्यावधी लोकांसारखे मद्यापासून दूर राहून आनंदी व सुखी जीवन जगण्यासाठी संस्था ऑनलाईन सभांमध्ये आपले स्वागत करीत आहोत.  आम्ही एकेकाळी मद्यपाश या आजाराला बळी पडलो होतो आणि आम्हाला हे माहित आहे की स्वतःचे अनुभव कथन करणे ही पद्धत इतर मद्यपिंना दारूपासून दूर राहण्यास उपयुक्त ठरते. असे संस्थेचे म्हणणे आहे. ज्यांना ऑनलाईन मीटिंग मध्ये सहभागी होण्याची इच्छा असेल त्यांनी  अधिक माहितीसाठी मो. नं.  ९०२२७७१०११, ८०९७०५५१३४ वर संपर्क साधावा. सदर सेवा २४ तास उपलब्ध आहे. वेबसाईट w.w.w. aagsoindia.org.








३ टिप्पण्या:

  1. धन्यवाद सर, आपल्यासारखे लोक तळीराम, तळीरामाने सॅनिटायझर प्यायले किंवा दुकान फोडले अशा कुचेष्टा किंवा तुच्छता दाखवणाऱ्या बातम्या वा ब्लॉग लिहिण्यापेक्षा तळीरामाला झालेल्या आजाराबद्दल व तोडग्याबद्दल लिहून प्रसिद्धी देत आहेत परत एकदा आभार

    उत्तर द्याहटवा
  2. श्री. दादासाहेब येंधे
    तुमचा ब्लॉग वाचला. मद्यपानाच्या समस्येवरती उपाय सुचविणारा ब्लॉग प्रसिद्ध केल्याबद्दल आभारी आहे.
    धन्यवाद दादासाहेब!

    उत्तर द्याहटवा
  3. श्री. दादासाहेब येंधे
    स.न. वि. वि.
    मद्यपानाच्या समस्येवरती उपाय सुचवणार ब्लॉग प्रसिध्द केल्याबद्दल आपला मनापासून आभारी आहे.
    संजू जे.

    उत्तर द्याहटवा