२६ जुलै, २०१९

तिकिटांचे दर कपात करा


तिकीट दरांमध्ये कपात करावी
एसटीच्या स्पर्धक असलेल्या ऐरावत आणि खासगी बससेवेचे तिकीट दर तुलनेने कमी आहेत. त्यातच कर्नाटक एसटी महामंडळात मागणी-पुरवठा तत्वानुसार तिकिटांचे दर कमी करण्यास मुभा आहे. महाराष्ट्रात याप्रकारे तिकीट दरांत चढ-उतार करता येत नाही. त्याच धर्तीवर एसटी महामंडळाने प्रवाशांना आपल्याकडे वळविण्यासाठी तिकीट दरांमध्ये कपात करावी. मागणीनुसार तिकीट दर कमी करण्याचे सूत्र अवलंबल्यास शिवशाहीचे प्रवासी नक्कीच वाढतील.-दादासाहेब येंधे, काळाचौकी, मुंबई
६ टिप्पण्या:

 1. Tikit Kami hone garjeche aahe.tarach shivsahikade pravasi yetil.-Nalini

  उत्तर द्याहटवा
 2. खरे आहे, एसटीने तिकिटाचे पैसे कमी करायला हवेत.कारण एसटीपेक्षाही खाजगी बसचे पैसे कमी आहेत. तसेच कर्नाटकच्या एसटीचेही पैसे कमी आहेत. आपण एकदम योग्य विषयावर लिहिले आहे. धन्यवाद

  उत्तर द्याहटवा
 3. तिकीट दर कमी करण्यासोबतच प्रत्येक एसटी डेपोही स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे.

  उत्तर द्याहटवा
 4. एस टी डिपो मधिल टॉयलेट दुरुस्त करुन रोक स्वच्छ करावेत.

  उत्तर द्याहटवा