२२ मार्च, २०२०

जनता कर्फ्युला मुंबईकरांकडून प्रचंड प्रतिसाद


जनता कर्फ्युला मुंबईकरांकडून प्रचंड प्रतिसाद
दादासाहेब येंधे, मुंबई: कोरोनाच्या भीतीमुळे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला स्वतःसाठी घराबाहेर पडू नका, जनतेने जनतेसाठी "जनता कर्फ्यु" पाळावा या केलेल्या आवाहनाला मुंबईत उत्स्फूर्त प्रतिसाद मुंबईकर देताना दिसत आहेत.
करोना या विषाणूचा वाढता प्रसार रोखण्यासाठी आणि नागरिकांमध्ये जागृती निर्माण व्हावी यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशात 'जनता कर्फ्यु'चं आवाहन केलं होतं त्याला मुंबईकर प्रचंड प्रतिसाद देत आहेत. मुंबईतच नव्हे तर ठाणे, पुणे, नागपूरसह संपूर्ण महाराष्ट्रात चांगला प्रतिसाद मिळत आहे. मुंबईत रस्त्यांवर लोकल आणि बसमध्ये प्रवाशी नसल्याने शुकशुकाट निर्माण झाला आहे. नागरिकांनी घरातच बसणे पसंत केल्याने घड्याळाच्या काट्यावर दिवसरात्र धावणारी मुंबई आज शांत झाली आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये.कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा