जनता कर्फ्यु लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
जनता कर्फ्यु लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

२२ मार्च, २०२०

अत्यावश्यक सेवा बजावणाऱ्यांबद्दल कृतज्ञता

जनता कर्फ्युला देशवासीयांकडून प्रतिसाद
दादासाहेब येंधे, मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार रविवारी संध्याकाळी ५.०० ते ५ वाजून ५ मिनिटांपर्यंत आपल्या घरातून, खिडक्यांत उभे राहून, गॅलरीतून  भांडी, घंटा, शंख आणि टाळ्या वाजवून करोना विषाणू विरोधात लढत असलेल्या लोकांचा सन्मान केला.
आम्ही या विषाणूशी लढण्यास वचनबद्ध आहोत असा संदेश जणू मुंबईकरांनी आपल्या कृतीतून व्यक्त केला आहे.











जनता कर्फ्युला मुंबईकरांकडून प्रचंड प्रतिसाद


जनता कर्फ्युला मुंबईकरांकडून प्रचंड प्रतिसाद
दादासाहेब येंधे, मुंबई: कोरोनाच्या भीतीमुळे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला स्वतःसाठी घराबाहेर पडू नका, जनतेने जनतेसाठी "जनता कर्फ्यु" पाळावा या केलेल्या आवाहनाला मुंबईत उत्स्फूर्त प्रतिसाद मुंबईकर देताना दिसत आहेत.
करोना या विषाणूचा वाढता प्रसार रोखण्यासाठी आणि नागरिकांमध्ये जागृती निर्माण व्हावी यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशात 'जनता कर्फ्यु'चं आवाहन केलं होतं त्याला मुंबईकर प्रचंड प्रतिसाद देत आहेत. मुंबईतच नव्हे तर ठाणे, पुणे, नागपूरसह संपूर्ण महाराष्ट्रात चांगला प्रतिसाद मिळत आहे. मुंबईत रस्त्यांवर लोकल आणि बसमध्ये प्रवाशी नसल्याने शुकशुकाट निर्माण झाला आहे. नागरिकांनी घरातच बसणे पसंत केल्याने घड्याळाच्या काट्यावर दिवसरात्र धावणारी मुंबई आज शांत झाली आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये.