२२ मार्च, २०२०

अत्यावश्यक सेवा बजावणाऱ्यांबद्दल कृतज्ञता

जनता कर्फ्युला देशवासीयांकडून प्रतिसाद
दादासाहेब येंधे, मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार रविवारी संध्याकाळी ५.०० ते ५ वाजून ५ मिनिटांपर्यंत आपल्या घरातून, खिडक्यांत उभे राहून, गॅलरीतून  भांडी, घंटा, शंख आणि टाळ्या वाजवून करोना विषाणू विरोधात लढत असलेल्या लोकांचा सन्मान केला.
आम्ही या विषाणूशी लढण्यास वचनबद्ध आहोत असा संदेश जणू मुंबईकरांनी आपल्या कृतीतून व्यक्त केला आहे.कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा