३० जून, २०१९
२९ जून, २०१९
२६ जून, २०१९
२५ जून, २०१९
दादर रेल्वे पोलीस ठाणेची उत्तम कामगिरी
दादर रेल्वे पोलीस ठाणेची उत्तम कामगिरी
दादासाहेब येंधे, मुंबई : घटना कोणतीही असो, पोलीस पुन्हा एकदा आपल्या ब्रिदवाक्यानुसार मुंबईकरांच्या मदतीस धावून आले. मंगळवार दिनांक २५/०६/२०१९ रोजी मध्य रेल्वेच्या दादर रेल्वे स्थानकावर सकाळी १०.०५ वाजता फलाट क्रं. ३ वर आलेल्या सीएसएमटी कडे जाणाऱ्या धीम्या लोकल मधून एक महिला प्रवाशी डब्यातून उतरत असताना अचानक तिला चक्कर आली.
भांडुप येथे राहणाऱ्या निकिता दिघे, वय अंदाजे २५ वर्षे. या कामानिमित्त सीएसएमटी कडे लोलकने प्रवास करत होत्या. दादर स्टेशनवर उतरत असताना अचानक त्यांना चक्कर आली. ही घटना कळताच चार महिला पोलीस त्या लोकल जवळ पोहोचल्या.
प्रसंगी दादर रेल्वे पोलिस ठाणेचे व्हिजिबल पोलिसिंग मध्ये समावेश असलेल्या महिला पोलीस यांनी क्षणाचाही विलंब न करता तसेच स्ट्रेचर व हमाल येण्याची वाट न पाहता तात्काळ सर्व महिला पोलिसांनी सदर आजारी महिलेस उचलून फलाट क्रं. ३/४ वरून फलाट क्रं. ६ वरील आकस्मिक रुग्णालय येथे उपचाराकरिता घेऊन गेल्या. डॉक्टरांनी त्या महिलेवर तात्काळ उपचार केले असता तिला सौम्य हृदयविकाराचा झटका येऊन गेला होता. तिच्यावर प्राथमिक उपचार करून नंतर तिला सोडून देण्यात आले. असे पोलीस निरीक्षक श्री. प्रसाद पांढरे यांनी सांगितले.
महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी दाखविलेल्या प्रसंगावधानाबद्दल व केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांचे सर्व थरांतून कौतुक होत आहे. एका महिला प्रवाशाचे प्राण वाचविल्याकरीता दादर रेल्वे स्थानकात उभ्या असलेल्या प्रवाशांनी पोलिसांचे कौतुक करीत त्यांना 'सॅल्यूट' ठोकला आहे.

मुंबईत आझाद मैदानात धरणं आंदोलन
मुंबईत आझाद मैदानात धरणं आंदोलन
दादासाहेब येंधे, मुंबई: मराठी भाषेचा अडकलेला अभिजात दर्जा, बंद पडणाऱ्या मराठी शाळा, शालेय पातळीवर मराठी अभ्यास न करण्यासाठी मिळणारी सवलत या पार्श्वभूमीवर 'मराठीच्या भल्यासाठी' या व्यासपीठाखाली एकत्र आलेल्या विविध संस्थांनी नुकतेच आझाद मैदानात आंदोलन केले.
मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीसाठी काम करणाऱ्या महाराष्ट्रातील २० संस्थांनी एकत्र येऊन 'मराठीच्या भल्यासाठी' हे व्यासपीठ निर्माण केलं आहे. या व्यासपीठाच्या वतीने मराठीच्या संदर्भात विविध मागण्यांसाठी मुंबईत आझाद मैदानात धरणं आंदोलन आयोजित करण्यात आले होते. मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबईच्या वतीने संघाध्यक्ष रवींद्र मालुसरे, कार्याध्यक्ष रमेश सांगळे,कार्यवाह नितीन कदम,सुनील कुवरे, अरुण खटावकर, नारायण परब, गुरुनाथ तिरपणकर,विलास खानोलकर, रामचंद्र जयस्वाल, उमाकांत सावंत, दादासाहेब येंधे आदी लेखक हे मोठया संख्येने उपस्थित होते.
२४ जून, २०१९
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)