१६ डिसेंबर, २०१९
१४ डिसेंबर, २०१९
१० डिसेंबर, २०१९
रंगारी बदक चाळ येथे दत्तजयंती उत्सवाचे आयोजन
रंगारी बदक चाळ येथे दत्तजयंती उत्सवाचे आयोजन
मुंबई, (दादासाहेब येंधे): काळाचौकी येथील रंगारी बदक चाळीच्या पटांगणात नवबालक क्रीडा मंडळ यांच्यावतीने श्री दत्तजयंती उत्सव, श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन ११ डिसेंबर रोजी करण्यात आले आहे. यानिमित्ताने दत्तजयंती उत्सवाचे औचित्य साधून सकाळी ९.०० ते रात्रौ ९.०० वा.पर्यंत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मंडळाचे प्रमुख विश्वस्त श्री. अनिल हेलेकर यांच्या उपस्थितीत सदर कार्यक्रम साजरा होणार असून दत्तगुरूंच्या पादुकांचे पूजन सकाळी ९ वाजता, होमहवन सकाळी १० ते दुपारी १.०० वाजता, श्रीसत्यनारायची पूजा दुपारी २.०० वाजता, महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ संध्याकाळी ५.०० वाजता आयोजित करण्यात आला आहे. सत्कार मूर्तींचा सत्कार, समणिका प्रकाशन तसेच २०२० च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात येणार आहे. या उत्सवात मोठया संख्येने सहभागी होण्याचे आवाहन मंडळाचे अध्यक्ष श्री. सुनिल पावसकर, कार्याध्यक्ष सुनिल घाडीगांवकर, सरचिटणीस सचिन राजमाने, कोषाध्यक्ष दयानंद घाडीगांवकर तसेच स्वागताध्यक्ष योगेश राणे यांनी केले आहे.
९ डिसेंबर, २०१९
६ डिसेंबर, २०१९
समुपदेशनाची गरज
समुपदेशनाची गरज
गेल्या दोन-तीन वर्षापासून शहरातील वाहतुकीला शिस्त लागावी यासाठी वाहतूक पोलिसांनी वाहतूक सुरक्षा स्वयंसेवक मोठ्या प्रमाणावर जनजागृती करत आहे. त्यामुळे वाहतुकीचे नियम पाळणाऱ्यांच्या संख्येत वाढ होताना दिसून येत आहे. पण, अद्याप कित्येकजण सर्रास वाहतूक नियमांचे उल्लंघन करताना दिसून येत आहेत. वाहतूक पोलिसांच्या दंडात्मक कारवाईचा देखील फार फरक वाटत नाही. कारवाईच्या विरोधात ओरड केली जाते. दंडात्मक कारवाई होऊनही हेल्मेट आणि सीटबेल्टची गरज वाहनधारकांना समजलेली नाही. तसेच नो पार्किंगच्या ठिकाणीही कशाही गाड्या उभ्या केल्या जात आहेत. नागरिकांच्या मानसिकतेत अद्याप बदल झालेला दिसत नाही. नियम मोडल्यास काय फरक पडतो अशी मुजोरी कायम होताना दिसते. कॉलेज, स्वयंसेवी संस्था पोलिसांच्यावतीने कायमच वाहतूक सुरक्षेच्या संदर्भात जनजागृती मोहीम राबविण्यात येते. अतिशय चांगल्या पद्धतीने वाहनधारकांना वाहतुकीच्या नियमांच्या संदर्भात जागरूक करूनही शहरात हवा तितका बदल घडलेला दिसत नाही. जेव्हा शहरातील सर्व वाहनधारक वाहतुकीचे सर्व नियम पाळतील तेव्हाच खऱ्या अर्थाने शहर स्मार्ट होईल. त्यासाठी दंडात्मक कारवाई जनजागृती मोहीम यांच्या जोडीला वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांची मानसिकता बदलण्यासाठी समुपदेशन होण्याची आवश्यकता आहे.-दादासाहेब येंधे, काळाचौकी, मुंबई

याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)





